पुणे : देशभरासह जगात आज महिला दिन साजरा होत असताना सांस्कृतिक शहरात महिला दिनाच्या (दि. ८) पूर्व संध्येला विविध भागात पाच महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. महिलांच्या कर्तृत्वाला आज सलाम दिला जातो. तर एकीकडे महिला दिन साजरा करत असताना दुसरीकडे त्यांना अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे.
खरंच महिला शहरात सुरक्षित आहेत का?
त्यामुळे खरंच महिला शहरात सुरक्षित आहेत का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासोबतच शासनाने बाल लैंगिक अत्याचार्याच्या कायद्यात बदल केला आहे. १ जुलै पासून नवीन कायद्याने गुन्ह्यांची नोंद देखील होणार आहे. त्यानंतरही बाल लैंगिक अत्याचार, महिलांवरील अत्याचार तसेच त्यांच्या अपहरणाच्या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे.
८ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
भारती विद्यापीठ परिसरात एका ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने ८ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही मुलगी शाळेत जाताना त्याने तिला सोसायटीच्या गार्डनमध्ये नेले. तेथे तीच्यावर अत्याचार केले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक भाबड करत आहेत.
अल्पवयीन मुलीचा मोबाईलमध्ये व्हिडिओ
दुसऱ्या घटनेत एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका ५९ वर्षीय व्यकतीवर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे सिंहगड परिसरात दुकान आहे. पिडीत मुलगी कोणतीही वस्तू घेण्यास गेली असता, तीच्या अंगाला स्पर्श करुन तो विनयभंग करत होता. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
इन्स्टावर ओळख अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार
इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचे समोर आले आहे. मुलीला राहत्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्यावर पालकांना हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात महाविद्यालयीन तरुणावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लग्नाच्या आमिष दाखवत १५ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सात महिण्यांपासून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. पुढील तपास महिला उपनिरीक्षक गपाट या करत आहेत.