Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलग दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस यांच्यात रात्री सव्वा दोन तास बैठक; शिंदे गटातील नाराजीवर बैठीकीत चर्चा?, “मंत्रिपद मिळालं नाही तर? शिंदे गट म्हणतो…” 

अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. दरम्यान, आता शिंदे गटात जोरदार धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रीपद मिळत नसल्यामुळं शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळं बैठकांचं सत्र सुरु आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 08, 2023 | 08:17 AM
सलग दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस यांच्यात रात्री सव्वा दोन तास बैठक; शिंदे गटातील नाराजीवर बैठीकीत चर्चा?, “मंत्रिपद मिळालं नाही तर? शिंदे गट म्हणतो…” 
Follow Us
Follow Us:

मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. दरम्यान, आता शिंदे गटात जोरदार धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रीपद मिळत नसल्यामुळं शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळं बैठकांचं सत्र सुरु आहे. (Shinde-Fadnavis Meeting)

शिंदे-फडणवीसांत रात्री सव्वा दोन तास बैठक…

दरम्यान, सध्या शिंदे गटात मोठी नाराजी आहे, कानामागून आला आणि…आमच्यानंतर सरकारमध्ये आले आणि मंत्री झाले, अशी भावना शिंदे गटाची आहे. सध्या अजित पवारांच्या सरकारमधील सहभागामुळं शिंदे गटात अस्वस्थता व चिंता वाढली आहे, बच्चू कडू, संजय शिरसाट, भरत गोगावले या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय अर्धी भाकरी मिळणार होती. त्यातली आता पाव भाकरी मिळेल, असं भरत गोगावलेंनी म्हणत नाराजी व्यक्त केलीय, त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी बुधवारी नागपूर दौरा अचानक रद्द करत मुंबईत परतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बैठक घेत आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर (गुरुवारी) रात्री उशिरा शिंदे-फडणवीस यांच्यात देखील बैठक झाल्यानंतर काल (शुक्रवारी) पुन्हा एकदा रात्री उशिरा शिंदे-फडणवीस यांच्यात सव्वा दोन तास बैठक झाल्याची बातमी ‘टिव्ही ९’ या वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

बैठकीत काय घडले…

सध्या राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, काहीही घडू शकते असं बोललं जातंय. दरम्यान, काल रात्री उशिरा शिंदे-फडणवीस यांच्यात देखील बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत शिंदे गटातील नाराज आमदार, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद मिळणार की नाही, याविषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाला दिलास दिला आहे. अजित पवार येण्याण काही फरक पडणार नाही. तुम्हाला मंत्रिपद दिली जातील, असा विश्वास फडणवीसांनी बैठकीत दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Web Title: On the second day in a row shinde fadnavis met for two and a half hours at night a discussion on the dissatisfaction of the shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2023 | 08:15 AM

Topics:  

  • current maharashtra political news
  • Dilip Walase Patil
  • jayant patil
  • maharashtra
  • maharashtra politics today
  • Nationalist Congress Party
  • Prafull Pate
  • supriya sule

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.