File Photo : Eknath Shinde-Devendra Fadnavis
मुंबई : महाराष्ट्रात सत्तापालट होऊन भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. त्यांच्या सरकारला 30 जून म्हणजे आजच्या दिवशी एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. पण, महाराष्ट्रभूषण समारंभातील दुर्घटना, विविध मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यांसारख्या गोष्टींमुळे टीकेलाही सामोरे जावे लागले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा गट तयार केला. त्यांच्यासोबत अनेक समर्थक आमदारही बाहेर पडले आणि शिंदे-फडणवीस जोडीने चमत्कार करत युतीचे सरकार आणले. 9 ऑगस्टला 18 मंत्र्यांचा समावेश करत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. तेव्हापासून दुसऱ्या विस्ताराची प्रतीक्षा आहे. शिंदेंसोबत असलेले बच्चू शिवसेनेमध्ये समन्वय समिती अजूनही कडू, आशिष जयस्वाल यांनी याबाबत वेळोवेळी नाराजीही दाखविली आहे.
शिंदे-फडणवीस यांच्यात जबरदस्त अतिवृष्टीग्रस्तांना समन्वय सुरुवातीपासूनच दिसत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी ‘देशात नरेंद्र मोदी, राज्यात एकनाथ शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून दिली गेली आणि मिठाचा खडा पडला. त्यावरून सारवासारवही झाली. आता दोघांनीही त्यावर पडदा टाकला आहे. भाजप- बनलेली नाही, महामंडळांवरील नियुक्त्याही रखडल्या आहेत. यातच विरोधकांच्या टीकेला उत्तरे देण्यातही सरकारचा बराच वेळ गेला आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत…
– औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव
– एक रुपयात पीक विमा.
– मुंबईत अधिमूल्य, विकास अधिभारामध्ये 50 टक्के सवलत
– पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती रकमेत वाढ
– संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेच्या मानधनात वाढ
– मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण सुरुवात