कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; वाचा... किती रुपयांना मिळणार!
महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यानंतर कांद्याची मागणी देखील वाढल्याचे पाहयला मिळत आहे. तर पावसामुळे आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 70 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कांद्याची आवक वाढणार नाही. अशा स्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असून ऐन सणासुदीत कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणणार आहे. पुण्याच्या घाऊक बाजारात कांदा ५०० रुपये प्रति १० किलो दराने मिळतो. दिवाळीपर्यंत याच कांद्याचा भाव 100 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दोन महिन्यांपूर्वी घसरलेले कांद्याचे भाव आवक घटल्याने पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. घाऊक बाजारात पुणे व नगर जिल्ह्यातून कांद्याची आयात केली जात आहे. घाऊक बाजारात कांद्याला 500 रुपये प्रति 10 किलो भाव आहे. येथे दररोज 50 ते 60 ट्रक बाजारात दाखल होत आहेत. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत आवक कमी राहील, त्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा: टोमॅटो 100 रुपये किलो; दोन महिने दर चढेच राहण्याची शक्यता, वाचा… नेमकं कारण?
गोदामांमध्ये साठवलेल्या जुन्या कांद्याची आवक सुरूच आहे. या कांद्याचा दर्जा चांगला आहे. नवीन कांद्याची आवक नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होते. तोपर्यंत तोच जुना कांदा बाजारात राहील. सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 70 रुपये किलो असून दिवाळीपर्यंत तो 100 रुपयांपर्यंत पोहोचेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
परदेशातून कांद्याला मोठी मागणी आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांतून मागणी असल्याने मार्केट यार्डातून दररोज 30 ते 40 गाड्या कांद्या दक्षिण भारतात जात आहेत. पुढील महिन्यात कर्नाटकात नवीन कांद्याची आवक होईल. त्यामुळे तेथील मागणी काही प्रमाणात कमी होईल. मात्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून मागणी कायम राहणार आहे. कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले की, घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे भाव पुढील तीन महिने वाढणार आहेत.
50 ते 70 रुपये किलो
10 किलो रुपये 500 रुपये 700