Photo Credit- Social Media 'ती 76 लाख मते कुठून आली, संजय राऊतांचा थेट सवाल
Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी नेत्यांची एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी जोरदार प्रचार केला जात आहे. नुकतचं राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याचपार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “आमचे सामान (ईसी निरीक्षकांद्वारे) तपासले जात आहे, मात्र तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे हेलिकॉप्टर, गाड्याही तपासत आहात का?संजय राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात पैसे कसे वाटले जातात हे आयोगाचे निरीक्षक पाहू शकत नाहीत? काय होत आहे ते आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा सांगत आहोत.”
हे सुद्धा वाचा: मोटारमनची सतर्कता, वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात टळला; बैलाच्या धडकेमुळे ट्रेनचा पुढचा भाग तुटला
तसेच एकनाथ शिंदेंच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोहोचले आहेत. सांगोल्यात काही नाक्यावर 15 कोटी पकडले. पण फक्त पाच कोटी दाखवले. उरलेले 10 कोटी कुठे आहेत? कोणाचे ते सांगितले का? गाडी कोणाची? कोण होतं गाडीत आम्हाला माहिती आहे. पण पैसे कोणाचे होते? कुठे गेले सांगितले का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
शिवसेना-यूबीटीचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर आरोप करत विधानसभा निवडणुकीत गुंडांची मदत घेतली जात असल्याचे सांगितले. अनेक गुडांची तुरुंगातून सुटका झाली असून पोलिसांच्या मदतीने 60 ते 70 विधानसभा जागांवर गुडांना पाठिंबा दिला जात आहे. टोळीयुद्धात अडकलेल्या लोकांची निवडणुकीत मदत घेतली जात आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांचे सर्व कामकाज वर्षा बंगल्यातून सुरू आहे.
सध्या राज ठाकरे आपल्या निवडणुकीच्या भाषणात उद्धव गटातील शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, जर कोणी महाराष्ट्राची लूट करत असेल. महाराष्ट्र तुटतोय. महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत मग अशा लोकांशी संतांच्या भाषेत का बोलायचे? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही काम केले आहे. कोणती भाषा कोणासाठी वापरली पाहिजे हे आपल्याला माहीत आहे.
राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खूप खास आहेत, त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट एकदा वाचली पाहिजे असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांना महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान काय माहीत? हे सर्व संपले आहे का? आम्ही लढणार? भाषा हे आपले शस्त्र आहे आणि ते शस्त्र आपण नक्कीच वापरू, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला.
हे सुद्धा वाचा: १५ दिवसांत मोदींचा तिसरा महाराष्ट्र दौरा! चिमूर-सोलापूर आणि पुण्यात आज सभा, वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल