सौजन्य - नवराष्ट्र टीम
तावडे म्हणाले, पूर्वी हेल्दी रिलेशन असायचे पण विरोधी पक्ष नेत्याचे सुद्धा कर्तृत्व होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं. ज्या प्रकारची हमरी तुमरी होते, सकाळी ९ वाजता भोंगा वाजतो त्याला उत्तरं दिली जातात. मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो, मी मुख्यमंत्री यांच्यावर तडाखून टीका करायचो. अधिवेशन सुरू असताना जोरदार टीका व्हायची. मधल्या सुट्टीत म्हणजेच जेवणाची सुट्टी झाली की मी माझ्या केबिनमध्ये मुख्यमंत्री त्यांच्या केबिन मध्ये जायचे. मला मुख्यमंत्री यांचा शिपाई चिठ्ठी घेऊन यायचा ‘तुमच्या वाहिनीने डबा पाठवला आहे की जेवायला येणार का?’ मी जेवायला जायचो. पुन्हा सभागृहात आलो की पुन्हा टीका करायची, असं यावेळी तावडे यांनी सांगितलं.
तेंव्हा मुख्यमंत्री उभे रहायचे आणि म्हणायचे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा आहे. इथे मराठी माणूस खाल्ल्या मिठाला जागतो असे कसे विरोधी पक्ष नेते? मी उभा राहिलो महोदय मी सुद्धा महाराजांचा मावळा आहे, शाहू फुलेंचा अनुयायी आहे, चिठ्ठी काढत दाखवली की ‘तुमच्या वाहिनीने डबा पाठवला आहे, मीठ वहिनींचे होते’ असे खेळीमेळीचे वातावरण होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर टीका करायचे पण जेवण सहकुटुंब करायचे, असंहा तावडे पुन्हा एकदा म्हणाले.






