मुंबई : अँटिलिया स्फोटके प्रकरणी (Antilia Case) सचिन वाझे (Sachin Waze) सध्या कोठडीत आहे. पण, ते निलंबित असताना त्यांना परत सेवेत कसे घेतले आणि त्याची प्रक्रिया काय होती? असा प्रश्न ईडीने (ED) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh Had Pressure Of 3 Ministers For Taking Sachin Waze Back) यांना विचारला आहे. त्यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. परमबीर यांच्या उत्तराने पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
[read_also content=”स्मार्ट सिटीत स्मार्ट व्हिलेजची सुरुवात – बेलापूर विभागातील दिवाळे गाव होणार नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज https://www.navarashtra.com/thane/kokan/thane/smart-village-plan-will-be-implemented-in-navi-mumbais-diwale-vilage-nrsr-231377.html”]
सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी तीन मंत्र्यांचा दबाव होता, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. यामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तीन मंत्र्यांचा समावेश होता, असं ईडीच्या जबाबामध्ये परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.
सेवेत परत का घेतले? त्याची प्रक्रिया काय होती, असा प्रश्न ईडीने परमबीर सिंह यांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, “एक समिती स्थापन केली होती. निलंबित असलेल्या अधिकाऱ्यांच्या कामाची पाहणी करून त्यांना सेवेत घ्यायचे की नाही ? याबाबत निर्णय घ्यायचा होता. त्याच यादीत सचिन वाझेचं नाव होतं. बैठक सुरू होती त्यावेळी अनिल देशमुखांचा दबावा होता की सचिन वाझेंना परत सेवेत घ्यावे. तसेच त्यांना मुंबईच्या गुन्हे शाखेत चांगली पोस्टींग द्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दबाव होता”, असे गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले आहेत.