कोल्हापूर – भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bhima Co-operative Sugar Factory Election) लागली आहे. या निवडणुकीत मोहोळ राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) असा सामना होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांची जीभ घसरली. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी बाळं आहेत, असे वक्तव्य केले आहे.
भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार राजन पाटील यांनी सत्ताधारी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीत वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. खासदार महाडिक यांनी प्रचार करताना राजन पाटील यांच्या मुलांना, ‘बाळांनो असे बोलू नका’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजन पाटील यांची जीभ घसरली. ‘आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले. तसेच आमच्या पोरांना वयाच्या १७ व्या वर्षीच ३०२, ३०७ ची कलमे लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचे समर्थन केले आहे.
राजन पाटलांचे वक्तव्य हे महिलांचे अपमान करणारे आहे. स्वत:च्या पोरांना लग्नाअधीच पोरे झाली आहेत, असे सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? असे म्हणत उमेश पाटील यांनी राजन पाटलांचा समाचार घेतला. राजन पाटील यांच्यावर टीका करताना उमेश पाटील (Umesh Patil) यांनी देखील आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. राजन पाटील यांच्यासारखा घाणरेडा नेता मोहोळ तालुक्याचा तीन वेळा आमदार झाला. याची आम्हाला लाज वाटत असल्याचे उमेश पाटील म्हणाले.