राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात विद्यार्थ्यांचं विद्यावेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०००० रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. बीएससी नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही वाढीव विद्यावेत मिळणार आहे.
“चंद्रहार पाटील पैलवान असले तरी कच्चे मडके…; खासदार संजय राऊतांचा जोरदार घणाघात
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात विद्यार्थ्यांचं विद्यावेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०००० रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. बीएससी नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही वाढीव विद्यावेत मिळणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
आपली लढाई तुकाराम विरूद्ध नथुराम….; जयंत पाटलांच्या विधानाने शरद पवार खुदकन हसले
सामाजिक न्याय विभाग – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा. आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणणणार
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग – पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०,००० रुपयांची वाढ. राज्यातील शासकीय भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ६२५० रुपयांची करण्यात आली आहे. तर बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनाही ८,००० रुपये विद्यावेतन मिळणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकात मोदींच्या ११ वर्षांच्या कार्याचा आढावा असेल, अशी माहिती त्यांनी दिली. विकासाच्या नव्या वाटचालाचीला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला जास्त निधी दिला आहे, असंही त्यांनी सांगितल.