फलटण आत्महत्या प्रकरण; डॉक्टर महिलेच्या सुसाईड नोटमध्ये कोणत्या खासदाराचे नाव?
Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिनसलं? एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण
याचवेळी त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत म्हणाले, “राज्याच्या पोलिस महासंचालकपदी एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना एक्सटेन्शन देत आहेत. तरीही राज्यातील महिलांच्या खून, आत्महत्या होत असतील तर आता भाजपमधल्या सगळ्या महान महिल्या नेत्या कुठे गेल्या, हे इतर कोणाचे सरकार असते तर महिलांवरील हल्ले, अत्याचार खून यावरून सत्ताधारी महिला नेत्यांच्या नेतृत्त्वाने रस्त्यावर तांडव केला असता. आता या महिला गप्प का, कसली वाट पहत आहेत. सरकार सरकारसारखे काम करत नही. गृहखाते अजगराप्रमाणे निपचिप पडले आहे. या राज्यातील महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
“महाराष्ट्रातला आणि देशातला भारतीय जनता पक्ष हा मूळ भाजप नसून फुगलेला, सुजलेला डुप्लिकेट भाजप आहे. आज भाजपमध्ये असलेले ६० ते ६५ टक्के आमदार हे बाहेरच्या पक्षातून आलेले आहेत. भाजपमधील प्रमुख पदाधिकारी आहेत. जे स्वत:ला नेते म्हणून मिरवतात, ते कधीकाधी भाजपविरोधात काम करणारे नेते होते. त्यांना भाजपची विचारधारा काय माहिती. जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघावर घाणेरड्या शब्दांत टिका करत होते. आज तेच संघाच्या चड्डी घालून संचालनात सहभागी होताना त्यांना पाहिलं की, तेव्हा लोक हसतात. त्यांना त्याची गंमत वाटते. भाजपमध्ये आज त्यांची स्वत:चे २० टक्केच लोक आहेत. भाजपमध्ये गेलेले सगळे हवशे नवशे आहेत. नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्यांची वेदना खरी आहे. ”
नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांच्याकडून भारताचे कौतुक ; PM मोदींकडे केली ‘ही’ खास मागणी
“भाजपने १५० प्लसचा नारा देईल, एकनाथ शिंदे १२० चा नारा देतील आणि अजित पवार १०० जागां जिकंतील असा त्यांचा आत्मविश्वास दिसत आहे. भाजपने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत ठाकरे बंधुचांच महापौर होणार, हे लक्षात ठेवा. यात दुमत असण्याचं कारण नाही. मुंबईत ज्या पद्धतीचे वातावरण आहे. भाजप आणि मिंधे गटाला पराभव स्पष्ट दिसत आहे. मुंबईत ठाकरे बंधु आणि शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे आणि त्यासोबत आमचे सर्व सहकारी पक्ष आम्ही ५५ ते ६० टक्के मते घेणार हा आकडा लिहून ठेवा. आमच्या आघाडीला पूर्ण बहूमत मिळेल.”
संजय राऊत म्हणाले, ” महाराष्ट्रात महिलांची सूरक्षा पूर्णपणे संकटात आहे. एका काळात महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राज्य मानले जात होते. पण ही घटना पश्चिम बंगाल, केरळ किंवा कर्नाटकमध्ये झाली असती तर भाजपने पूर्ण देशात असा गोंधळ घातला असता. पण काल मुंबईत एका मुलीवर भररस्त्यात हल्ला झाला, फलटणमध्ये एका महिला डॉक्टरला आत्महत्या करण्याची वेळ आली, तिच्यावर एका पोलीस निरीक्षकानेच बलात्कार केला, आता कुठे आहेत गृहमंत्री.” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. “महिलांच्या बाबतीत हे सरकार आणि गृहखाते असंवेदनशील आहे. सरकार काय करत आहे, विरोधकांवर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस खात्याचा वापर केला जात आहे. विरोधकांचे फोन टॅप होत आहेत. राजकीय पक्ष तोडण्या-फोडण्यासाठी पोलिसांचा वापर होतोय, पण महिलांच्या सुरक्षी ममात्र वाऱ्यावर आहे. एकाच दिवसात राज्यात दोन महिलांची हत्या होते कुठे आहेत देवेंद्र फडणवीसजी, कुठे आहेत त्यांच्या लाडक्या बहिणी,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.






