चिपळूण : रत्नागिरी येथील एका महिलेच्या श्वास नलिकेत अडकलेली पिन वालावलकर रुग्णालयाच्या टीमला यश आले आहे. यामुळे या महिलेच्या नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल महिलेच्या नातेवाईकांनी डेरवण रुग्णालयाच्या डॉक्टरांना धन्यवाद दिले आहेत.
रत्नागिरी येथील एका २३ वर्षीय महिलेने आपल्या मोबाईलचे सिम बदलतांना सिम कार्ड बदलण्याची पिन तोंडात ठेवलेली, तेव्हा चूकून त्या महिलेने ती सिम कार्डची पिन गिळली. त्यावेळेस तिला श्वासोश्वासाला किंवा गिळायला काही त्रास होत नव्हता म्हणून ती रात्री डॉक्टरांकडे न जाता घरीच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथे सर्जन डॉ. रविद्रं गोंधळेकर यांना दाखवले तेव्हा त्यानी अन्ननलिकेची स्कोपी केली पण त्यांना ती पिन दिसली नाही नंतर त्यांनी छातीचा एक्स- रे आणि (CT Scan) सिटी स्कॅन केला. त्यामध्ये त्यांना ती उजव्या बाजूच्या श्वास नलिकेत दिसली. डॉ. गोंधळेकर यांनी लगेच पेशंटला वालावलकर हॉस्पिटला जाण्यास सांगितले. वालावलकर हॉस्पिटलमधे येताच पेशंटला वालावलकर रुग्णालयाचे ई. एन. टी सर्जन डॉ. राजीव केणी यांनी तातडीक सेवा विभागात तपासले. नातेवाइकांना इमर्जन्सी ऑपरेशन करून सिम कार्डचे पिन श्वसनलिकेतून काढण्याचा सल्ला दिला.
हेदेखील वाचा – पाकिस्तानचा बांग्लादेश विरुद्ध झालेल्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीने संपूर्ण टीमला खडसावले!
नातेवाईकांनी क्षणाचा विलंब न करता वालावलकर हॉस्पीटलच्या कान, नाक, घसा तज्ञांवर विश्वास ठेवून ऑपरेशनची तयारी दाखवली. डॉ. राजीव केणी यांनी ऑपरेशनला लागणाऱ्या पूर्वतपासण्या आणि ऑपरेशनची तयारी लगेच करून घेतली. रात्री सुमारे १० वाजता पेशंटला ऑपरेशनला घेण्यात आले. डॉ.राजीव केणी यांनी अत्यंत कुशलतेने ब्रोन्कोस्कोपी करून उजव्या फुफुसाच्या श्वासनलिकेतील सिम कार्डचे पिन बाहेर काढली. अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया सहजरित्या झाल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
ब्रोन्कोस्कोपी ही शस्त्रक्रिया अवघड यांच कारणासाठी आहे. यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका असतो. तसेच भूल देणे खूप कठीण असते. या शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे अत्यंत अवघड असे काम डॉ.लीना ठाकूर, डॉ.गौरव बावीसकर आणि त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे पार पडले. रुग्णांचा वालावलकर हॉस्पीटलच्या डॉ. राजीव,डॉ. प्रतीक व डॉ. सीजा या कान- नाक- घसा तज्ञांवर वाढलेला विश्वास हीच त्यांच्या यशाची पोच पावती होय.