पोलिसांची नीलेश चव्हाणच्या घरी झाडझाडती (फोटो - सोशल मिडिया)
पुणे: राज्यात सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान या घटनेतील आरोपी नीलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज पोलिसानी नीलेश चव्हाणच्या घरी झाडझाडती घेतली. या वेळेस त्यांना अनेक महत्वाचे पुरावे सापडले असल्याचे समोर आले आहे.
नीलेश चव्हाणच्या घरी झाडझाडती केली असता पोलिसांनी त्याच्या घरातून शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांचे मोबाईल जप्त केले आहेत. तसेच नीलेश चव्हाणचा एक लॅपटॉप देखील जप्त केला आहे. नीलेशचा पासपोर्ट आणि पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. आता या लॅपटॉपमधून पोलिसांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नीलेश चव्हाणला अटक केल्यावर त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. आज पोलिसांनी त्याच्या घरी झाडझाडती घेतली असता, लता, करिश्मा आणि शशांक यांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलमधून पोलिसांना अनेक महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.
निलेश चव्हाणला पोलीस कोठडी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले. शुक्रवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये अटक करुन पुण्यात आणले होते.
दरम्यान गेल्या 10 दिवसापासून फरार असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आज (31 मे) त्याला कार्टात हजर करण्यात आलं होतं, त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवीचं बाळ निलेशने कोणत्या अधिकरावर घेतलं, तसंच त्याच्याकडून पिस्तूल आणि मोबाईल डेटा जप्त करायचा आहे, यासाठी त्याची कोठडी पोलिसांनी मागून घेतली आहे.
Vaishnavi Hagwane Case : हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला? वाचा संपूर्ण घटनाक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हा शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचा आरोप आहे. तो शशांक आणि वैष्णवी यांच्यातील वादातही अनेकदा सहभागी असायचा. तो शशांकचा व्यावसायिक भागीदार असल्याचेही म्हटले जाते. तो अनेकदा कौटुंबिक वादात अडकत असे. निलेशचे हे वर्तन उघडकीस आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सुनेला पाठिंबा देण्याऐवजी त्याचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंटाळून निलेशची पत्नी घराबाहेर पडली. तिने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे २०२२ मध्ये निलेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने निलेश चव्हाणला अटकपूर्व जामीन मंजूर केला. वैष्णवीचे कुटुंब मुलाचा ताबा घेण्यासाठी पोहोचले तेव्हा निलेश त्यांना पिस्तूल दाखवून धमकावत असे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.