भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये राजकीय वाद निर्माण झाला (फोटो - सोशल मीडिया)
राज्यातील सत्तांतर प्रकरणात संतोष बांगर द हे ‘५० खोक्यांचे लाभार्थी’ होते, असा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी केली. आणि भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. यावेळी 50 खोके एकदम ओके अशी घोषणा देखील विरोधकांनी केली. हे आरोप अनेकदा शिंदे गटाने फेटाळले आहेत. मात्र आता भाजपच्या नेत्यानेच संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
‘हे’ आहे जगातील सर्वात जुने हिंदू मंदिर; 2,000 वर्षांची परंपरा अन् देवीची रहस्यमय आख्यायिका
भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेला गंभीर आरोप आता मोठ्या व राजकीय वादळाला कारणीभूत ठरला आहे. मुटकुळे यांच्या वक्तव्यानंतर प्रत्युत्तर एक देताना आमदार संतोष बांगर यांनी देखील आमदार मुटकुळे यांच्या चारित्र्यावर थेट वार करत वातावरण आणखी पेटवले आहे. मुटकुळे यांनी म्हटले होते की, शिंदे बंडाच्या आदल्या दिवशी बांगर रडत ठाकरे यांच्याशी निष्ठा व्यक्त करत होते, पण दुसऱ्याच दिवशी शिंदे गटात सामील झाले व सत्तांतरासाठी ५० कोटींचा लाभ घेतला, असा गंभीर आरोप भाजप आमदाराने केला.
बांगरांचा पलटवार : “मुटकुळे यांच्या चारित्र्याचा तपशील सांगु का?”
भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या आरोपांना संतप्त होत शिंदे गटाचे संतोष बांगर यांनी उत्तर दिले. त्यांच्या आरोपांवर प्रतिउत्तर देताना आमदार बांगर म्हणाले “वाशिमला अड्ड्यावर कोण सापडले? अकोल्याला अड्ड्यावर कोण सापडले? गाडीपुऱ्यात घराला कुलूप कोणी लावले? हे सर्व जनतेला माहिती आहे माझ्यावर आरोप करणाऱ्या मुटकुळे यांनी आधी स्वतःचा चेहरा आरशात बघावा!” याच बरोबर बांगर यांनी “मुटकुळे, यांना मारा उत्तर!” अशा तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत भाजप आमदारांवर सरळ चारित्र्यावरच प्रहार केला.
आम्ही दोघे भाऊ-भाऊ! ठाकरे बंधूनी टाकला डाव; ‘या’ महापालिकेत युती, मविआ काय करणार?
मुटकुळे-बांगर आमनेसामने
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आमदारांमधील आरोप-प्रत्यारोप परिस्थिती अधिकच चिघळली आहे. या निवडणुकीत विकासाचे मुद्दे मागे पडले असून राजकीय प्रतिष्ठेची थेट लढत उफाळली आहे. हिंगोलीत सत्तांतरातील ‘५० खोक्यां’चा मुद्दा, त्यावरून झालेले चारित्र्याचे आरोप आणि दोन्ही आमदारांची तुफान राजकीय वाकयुद्ध होत असल्याने राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे.






