निवडणुकीपूर्वीच हवेतील राजकारण तापलं; इच्छुकांकडून स्वत:च्याच उमेदवारीची घोषणा
Haveli Politics: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची औपचारिक घोषणा झाली नसली तरी हवेली तहसीलमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षणाच्या घोषणेची वाट न पाहता उमेदवारांनी गावोगावी जाऊन आपला दावा मजबूत करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गावोगावी अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत.. गणेशोत्सवाच्या वातावरणात उमेदवारांनी संधीचा फायदा घेतला आहे. ते गणेश मंडळांना भेटत आहेत, आरतीला उपस्थित राहून सोशल मीडियावर आपला दावा मांडत आहेत.
राजकीय रणनीतीचा एक भाग म्हणून, महिला, पुरुष आणि इतर आरक्षण श्रेणींमध्ये नावे येण्याची शक्यता लक्षात घेऊन उमेदवारांना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहायचे आहे. आरक्षणानंतर कोणत्या श्रेणीला कोणता गण मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी अनेक उमेदवारांनीतिकीट मिळण्याची शक्यता नाही, हे लक्षात घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी, हे उमेदवार विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि जनसंपर्क वाढविण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थ्याच्या निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी यावेळी युती आणि आघाडीत चुरशीची लढत होणार असल्याचेही बोलले जात आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि मनसे यांच्यात एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात समन्वय होऊ शकतो, अशी चर्चा जोर धरत आहे. स्थानिक पातळीवर, जनतेचे लक्ष आता मराठा आरक्षणाच्या घोषणेकडे लागले आहे. आरक्षण जाहीर होताच निवडणूक समीकरणे बदलू शकतात, परंतु उमेदवारांच्या हालचालींमुळे हवेलीतील निवडणुकीचे वातावरण आधीच तापलेले आहे.
Manoj Jarange News: मराठ्यांना हुसकावून लावू नका…; जरांगेचा फडणवीस सरकारला थेट इशारा
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या गटांची व पंचायत समितीच्या गणांची प्रारूप यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार हवेली तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहेत. राज्यातल कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील राजकीय नेत्यांच्या सततच्या पक्षांतरामुळे स्थानिक स्तरावरची समीकरणे गुंतागुंतीची झाली असून कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार मंडळांना भेटी देत असून त्यांच्या हस्ते आरत्या घेतल्या जात आहेत. महिला, पुरुष आणि इतर आरक्षण गट-गणात नाव निघाले तरी तयारी ठेवण्याचे धोरण इच्छुकांनी स्वीकारले आहे. इच्छुक उमेदवार सोशल मीडियावर आपण उमेदवार असल्याचा दावा करत आहेत . पण आरक्षणाचा अंतिम निर्णय आणि पक्षांचे अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतरच रिंगणात कोण उतरणार, हे स्पष्ट होणार आहे.
पुदिन्याच्या पानांचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल उपयुक्त, जाणून घ्या वापर करण्याची सोपी पद्धत
पक्षश्रेष्ठींना फेर्या, अपक्षाची तयारी
आपल्याच सोईचे आरक्षण मिळावे या अपेक्षेने इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींना गाठीभेटी देत आहेत. मात्र उमेदवारी नाकारली गेल्यास काही उमेदवार स्वबळावर अपक्ष म्हणून लढण्याची घोषणाही करत आहेत. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणे, लोकसंग्रह वाढवणे आणि सोशल मीडियावर सक्रियता अशा प्रयत्न सुरू आहेत.
तरुणांची रंगीत तालीम
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्यात तरुणांना संधी मिळाल्याने अनेक तरुण या पदांच्या राजकारणाचे स्वप्न रंगवू लागले आहेत. लोकसंपर्क, सामाजिक कामे, सभा-मेळाव्यांत सहभाग याद्वारे तरुणाई निवडणुकीसाठी सराव करताना दिसत आहे.
हवेलीतील चर्चेतले राजकीय गणित
हवेली तालुक्यात , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस व मनसे एकत्र येणार का? अशी मोठी चर्चा सुरू आहे . दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) हातमिळवणी करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.