पुदिन्याच्या पानांचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल उपयुक्त
भारतीय स्वयंपाक घरात वेगवेगळ्या भाज्यांचे आहारात सेवन केले जाते. भाजी, चटणी किंवा इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात. त्यातील अतिशय सुगंधी आणि चविष्ट भाजी म्हणजे पुदिना. पुदिन्याच्या पानांचा वापर करून चटणी बनवली जाते. शरीर कायमच ताजेतवाने ठेवण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन केले जाते. कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस इत्यादी पदार्थ घालून पुदिन्याच्या पानांची चटणी बनवली जाते. जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. अपचन किंवा सर्दी खोकल्याची समस्या उद्भवल्यानंतर पुदिन्याच्या पानांचा चहा बनवून प्यायला जातो. आज आम्ही तुम्हाला पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? पुदिन्याच्या पानांचे आहारात कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात पुदिन्याच्या पानांचे नियमित सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये जीवनसत्त्व ए, जीवनसत्त्व सी, तसेच फॉलिक ऍसिड, रिबोफ्लेविनसारखी बी कॉम्प्लेक्स इत्यादी अनेक आवश्यक पोषक घटक आढळून येतात. याशिवाय आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मँगनीज इत्यादी अनेक घटक आढळतात. पुदिन्याच्या पानांचा वापर करून तेल तयार केले जाते. या तेलातील मेन्थॉल गुणधर्म शरीरात थंडावा निर्माण करतात. याशिवाय श्वासनमार्ग स्वच्छ ठेवतात.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन केले जाते. घरात लिंबू सरबत किंवा कोणतेही सरबत बनवल्यानंतर त्यात पुदिन्याची पाने टाकली जाते. या पानांच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते. खोकला, सर्दी किंवा शवसनासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर पुदिन्याच्या तेलाचा सुगंध घ्यावा. यामुळे श्वसनमार्ग स्वच्छ होतो. पोटात वाढलेला गॅस, अपचन, ऍसिडिटी कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. पुदिन्याची पाने चावून खाल्यास पोटात वाढलेली ऍसिडिटी आणि आम्ल्पित्त कमी होण्यास मदत होते. आहारात कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे.
सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी
पुदिन्याच्या पानांचा वापर करून तुम्ही डिटॉक्स पेय सुद्धा बनवू शकता. यासाठी बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात पुदिन्याची पाने, लिंबाचे तुकडे आणि काकडी टाकून रात्रभर पाणी तसेच ठेवून द्या. तयार केलेले पाणी उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल. याशिवाय पुदिन्याच्या चटणीचे आहारात सेवन करावे.