महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या २०२४ वर्षात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत नियोजित करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयोगाकडून दरवर्षी अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात येतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी आयोगाकडून अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात येतं.
आयोगाकडून २०२४ मध्ये १६ परीक्षांचे नियोजन करण्यात आलं आहे. या परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब , गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षांचा समावेश आहे. आयोगाकडून गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आलं आहे.
[blockquote content=”एमपीएससी आयोगाने २०२४ साली होणाऱ्या परीक्षाचे वेळाकपात्रक जाहीर केले आहे. परंतु २०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा काळ पण तोच आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमुळे अडचणं येऊ शकते.” pic=”” name=”- महेश घरबुडे (कार्याध्यक्ष. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती)”]
दरम्यान, शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर नियोजित महिन्यामध्ये वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल, असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वेळापत्रकात काही बदल झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.
आयोगामार्फत सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://t.co/ovB8MYhmG3
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 10, 2023