MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर (फोटो सौजन्य-X)
MHADA Lottery 2025 News In Marathi : स्वत: चे आणि हक्काचे घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असते. आता तुमचं हेच स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. म्हाडाकडून बंपर लॉटरी काढण्यात आली आहे. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) कोकण मंडळाने घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Mhada) नाशिक मंडळाने नाशिक शहरी भागातील विविध निवासी प्रकल्पांतर्गत ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मुंबईतील म्हाडाच्या मुख्यालयातून ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत केले.
यावेळी मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार अवलकंठे, मुख्य अभियंता धीरजकुमार पंडीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ही लॉटरी आयोजित करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले आहे की या लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असेल.
घर विकत घेण्यापूर्वी घराची किंमत माहित असणं गरजेचे आहे. दरम्यान ग्राहकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या मदतीशिवाय म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून थेट अर्ज करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले. म्हाडाने विकसित केलेली प्रणाली अतिशय सोपी आणि सुरक्षित आहे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नाही. हे फ्लॅट कमी उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. नाशिक बोर्डाचा हा या वर्षीचा तिसरा ड्रॉ आहे आणि याआधी बोर्डाने ३७९ फ्लॅट, १०५ दुकाने आणि ३२ भूखंड यशस्वीरित्या वाटले आहेत. ही घरे १५.५१ लाख रुपयांपासून ते २७.१० लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असतील.
४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन ठेव रक्कम भरण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत तुम्ही आरटीजीएस/एनईएफटीद्वारे पेमेंट देखील करू शकता. अंतिम यादी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता प्रकाशित केली जाईल.
या सोडतीत गंगापूर शिवार (५०), देवळाली शिवार (२२), पाथर्डी शिवार (६४), म्हसरूळ शिवार (१९६), नाशिक शिवार (१४) आणि आगर टाकळी शिवार (१३२) येथे फ्लॅट उपलब्ध आहेत. इच्छुक अर्जदारांनी कोणत्याही एजंट किंवा सल्लागारामार्फत अर्ज न करता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावेत असे आवाहन संजीव जयस्वाल यांनी केले आहे.