नीलम गोऱ्हे यांची बाजू सावरत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला(फोटो - सोशल मीडिया)
पुणे : शिवसेना हा सर्व सामान्यांच्या विकासासाठी काम करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात अनेक चांगल्या उपक्रमाची अंमल बजावणी होत आहे. शिवसेनेच्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाने गोरगरीब कुटुंबातील पालकांना वेगळ्या अर्थाने मदत होत आहे. शिवसेना करीत असलेल्या या कामामुळे सर्व सामान्य नागरिकांना अनेक चांगल्या संधी मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासाला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या ना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी आज शिवाजीनगर भागात आयोजित केलेल्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजू पवार, संजय गवळी, करुणा घाडगे आदी उपस्थित होते. शिवाजीनगर परिसरातील ४००० विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शिवसेनेने उभे केलेले काम हे छोट्या छोट्या लोकांनी मध्येच काही प्रसंग निर्माण केल्याने थांबत नाही. सामान्य जनतेच्या मनाचा आणि लोकभावनेचा विचार राजकारणात होणे अधिक महत्त्वाचे आहे. हा विचार शिवसेनेत नेहमीच होतो, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
[read_also content=”सिद्धटेक ते करमाळा राज्य महामार्गाचे काम लवकरच लागणार मार्गी; २५३ कोटी रुपयांची मंजुरी https://www.navarashtra.com/maharashtra/siddhatek-to-karmala-state-highway-work-to-start-soon-sanction-of-rs-253-crores-nrdm-305223.html”]