Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

BJP Pradesh Karyakarini Pune: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि त्याला उत्तर (Counter) देण्यासाठी भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना मिळालेली तुलनेने कमी उपस्थिती, यावर फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2026 | 11:31 AM
Devendra Fadnavis, Pune BJP News, Ravindra Chavan,

Devendra Fadnavis, Pune BJP News, Ravindra Chavan,

Follow Us
Follow Us:
  • भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील नेत्यांवर टोलेबाजी
  • राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उत्तर देणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांतील कमी गर्दीवरून विचारला जाब
  • भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनातील अल्प उपस्थितीवर व्यक्त केली तीव्र नाराजी
BJP Pradesh Karyakarini Pune Devendra Fadnavis: भाजप प्रदेश कार्यकारणीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पक्षाच्या गटबाजीवरून पदाधिकाऱ्यांना सुनावल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसबरोबर सुरु असलेला वाद, ‘स्पीकर’ वरून भाजपमध्येच असलेले मतभेद अशा विविध कारणांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यात आले होते.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, विविध मोर्चाचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष तसेच माजी खासदार आणि माजी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Beed-Jalna Violence: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले

 

या बैठकीत आगामी राजकीय आव्हानांसाठी पक्ष संघटनेला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही बैठक केवळ प्रदेश कार्यकारिणीची बैठक न राहता, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एकप्रकारची ‘कार्यशाळा’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या बैठकीसोबतच पुण्यातील स्थानिक भाजप नेत्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वतंत्रपणे ‘शाळा’ घेतल्याची चर्चा अधिक रंगली आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि त्याला काऊंटर करण्यासाठी भाजपकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमांना मिळालेला तुलनेने कमी प्रतिसाद, यावरून स्थानिक नेत्यांना फडणवीसांनी जाब विचारल्याची चर्चा आहे.

स्थानिक नेतृत्व प्रभावी व्हावे

भाजप युवा मौचांच्या आंदोलनांना अपेक्षित गर्दी होत नसल्याचा मुद्दाही फडणवीसांनी उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये कार्यकत्र्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

 

टीकेला प्रभावी उत्तराची अपेक्षा

पुण्यातील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कडून सातत्याने भाजपचे नेते आणि पक्षाच्या कामकाजावर टीका केली जात आहे. मात्र, त्याला पक्षाकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले जात नसल्याचा मुद्दाही फडणवीसांनी उपस्थित केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. पुण्यात भाजपच्या स्थानिक पातळीवर महापालिका, आमदार, खासदार आणि विविध नेत्यांचे स्वतंत्र गट तयार झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. या गटबाजीचा फटका पक्ष संघटनेला बसू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नी स्थानिक नेत्यांना स्पष्ट शब्दांत सुनावल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Pune news devendra fadnavis reprimands pune bjp leaders in pradesh karyakarini meeting bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • BJP Politics
  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
1

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
2

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
3

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
4

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.