जेजुरीजवळ भीषण अपघात; ८ जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली असून, साहित्य उतरवत असलेल्या पिकअपला एका भरधाव कारने धडक देऊन ८ जणांचा जागिच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाचजण पुणे जिल्ह्यातील असून, तिघे सोलापूर व उत्तरप्रदेशातील असे आहेत. अपघाताने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
मोठी बातमी! पिंपरीत भरधाव वेगातील क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू, देहू-आळंदी रस्त्यावरील घटना
सोमनाथ रामचंद्र वायसे, रामु संजिवन यादव (रा. दोघेही.नाझरे, ता. पुरंदर), अजयकुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापुर), अश्विनी संतोष ऐसार (रा. नागरसुर, सोलापूर), अक्षय शंकर राऊत (रा.झारगडवाडी, ता. बारामती) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, एका व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. याघटनेत ५ जण गंभीररित्या जखमी झाले असून, इतर दोन किरकोळ जखमी आहेत. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Nagpur News : भिलगाव परिसरातील औषधनिर्मिती कंपनीत मोठा स्फोट; एकाचा मृत्यू, सहाजण गंभीर
पोलिसांच्या माहितीनुसार, जेजुरी मोरगाव रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाबा येथे एक पिकअप टेम्पो थांबला होता. त्यामधील साहित्य खाली उतरवण्याचे काम सुरू होते. दोघेजण साहित्य खाली घेत होते. यादरम्यान, पुण्याकडून मोरगावकडे जाणाऱ्या एका भरधाव स्वीफ्ट डिझायर कारने या पिकअपला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कारला देखील या स्वीफ्ट कारने धडक दिली. ती त्या कारवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.