वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप (संग्रहित फोटो)
पिंपरी : दोन मित्रांचे भांडण झाले. एक मित्र रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करतो, असे सांगून रेल्वे ट्रॅकवर गेला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्राचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रावेत येथे घडली.
गणेश विठ्ठल लाड (बारामती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश याचे वडील विठ्ठल किसन लाड (वय ५३) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजित गणेश गोळे (वय २५,भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश लाड आणि अभिजित गोळे हे मित्र होते. गणेश याच्या मैत्रिणीवरून आणि त्या दोघांमध्ये पार्टनरशिपमध्ये असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून त्यांच्यात वाद झाले.
दरम्यान, अभिजित हा रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा त्याने बनाव केला. तो रावेत येथे आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर गेला. मित्र आत्महत्या करत असल्याने त्याला वाचवण्यासाठी गणेश गेला. अभिजित रेल्वे ट्रॅकवर असल्याने त्याला बाजूला करण्यासाठी गणेश देखील रेल्वे ट्रॅकवरून जात होता.
अभिजित बाजूला झाला अन् गणेश चिरडला गेला
रेल्वे आल्यानंतर अभिजित अचानक ट्रॅकवरून बाजूला झाला आणि गणेश रेल्वेखाली चिरडला गेला. जखमी गणेश याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता अभिजित पळून गेला. यामध्ये गणेश याचा मृत्यू झाला. रावेत पोलीस तपास करत आहेत.
समृद्धी महामार्गावर अपघात
समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथून समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जात असलेल्या आयशर चालकाला डुलकी लागली. अशातच त्याने फलकाच्या लोखंडी खांबाला धडक दिली. या अपघातात आयशरचालक जागीच ठार झाला असून, क्लीनर जखमी आहे.