पुणे – चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरणामध्ये स्थानिक पत्रकार गोविंद वाकडे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे.
काल चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इचगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज गरबडेनं चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं.