अजित पवारांची विरोधकांवर टीका (फोटो - ani)
जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित दादांची प्रतिक्रिया
अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर टीका
हंबरडा मोर्च्यावर अजित पवारांचे भाष्य
पुणे: सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांच्यावर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.पुण्यात जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार उपस्थित हाेते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही आपत्तीच्या वेळी सरकार पाहणी करून, पंचनामे करून माहिती संकलित करते व त्यानुसार मदत करते. मात्र, जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्ष करत असतात. सरकारची मदत तुटपुंजी आहे, अशी टीका करतात, मागणी करणे, टीका करणे हे विरोधकांचे कामच असते.’’
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षतर्फे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या हंबरडा मोर्चा विषयी प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी ठाकरे यांचे नाव न घेता आत्मपरीक्षण करण्याची टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांना व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांंना पैशाची व धान्याची मदत दिली आहे. जाहीर केलेल्या साडेतीनशे कोटीच्या पॅकेजचे पैसै दिवाळीपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मदतीसाठी केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात बदल करता येत नाही. त्यामुळे शेतीचे पंचनामे, रस्ते व पुलांचे नुकसान आदींची सर्व माहिती घेऊन त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar News: अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं… ; बैठकीत नेमकं काय घडलं?
सहकारमंत्री पाटील यांना सूचना करीन
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत अजित पवार म्हणाले, पाटील यांनी काय वक्तव्य केले मला माहिती नाही. ते बोलले असतील तर बळीराजा बद्दल असे बोलणे योग्य नाही. भेटल्यानंतर त्यांना मी योग्य त्या सूचना करीन.
अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं
अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (७ ऑक्टोबर) रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांची हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी छगन भुजबळांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
काही नेते विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या मतांमुळे पक्षाचीही प्रतिमी मलिन होऊ लागली आहे.असं म्हणत अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, छगन भुजबळांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत घेतलेल्या भूमिकेवरून ही नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.