मुंबई-पुणे मार्गावर मेगा-ब्लॉक (फोटो- istockphoto)
रद्द होणाऱ्या प्रमुख एक्स्प्रेस गाड्या
काही महत्वाच्या गाड्या फक्त पुणे पर्यंतच चालवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. उदा. 11030 (कोल्हापूर–CSMT कोयना) आणि 11302 (बेंगळुरू–CSMT) यांचे पुढील मार्ग (पुणे ते मुंबई) रद्द राहतील. काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांना पर्यायी मार्गांवर वळवण्यात आले असून, स्थानिक (लोकल) सेवांपैकी पाच लोकल ट्रेन सुद्धा या ब्लॉकमुळे रद्द केल्या आहेत. परिणामी प्रवास वेळात विलंब व पर्यायी मार्गांमुळे प्रवासी गैरसोयींचा सामना करू शकतात.
नोकरदार, दैनिक प्रवासी आणि व्यावसायिक प्रवाशांची यामुळे मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. पर्यायी बस अथवा राज्य परिवहन वाहन किंवा इतर रेल्वे मार्गांचा विचार करावा. आपले तिकिट रद्द किंवा रिफंड किंवा बदलायचे असल्यास IRCTC पोर्टल, स्थानक काउंटर किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत घोषणांचा आधार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे रुळ ओलांडणे ठरतंय जीवघेणं
पुणे रेल्वे विभागात रेल्वे रुळ ओलांडताना अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. याची आकडेवारी आता समोर आली आहे. यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या अपघातांची संख्या 301 वर पोहोचली आहे. या अपघातांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे ट्रेनखाली येणे किंवा रुळांच्या जवळ असलेल्या व्यक्तींचा ट्रेनशी संपर्क होणे हे आहे. अनेक वेळा हे प्रकार मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर घडतात. तसेच गाडी रुळावरून घसरणे, इतर गाड्यांशी टक्कर होणे किंवा मानवी चुकांमुळेही जीवितहानी झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या काळात पुणे विभागातील एकूण 107 स्थानकांवर या अपघाती घटनांची नोंद झाली आहे.
रेल्वे रुळ ओलांडणे ठरतंय जीवघेणं; पुणे रेल्वे विभागात सप्टेंबर अखेरपर्यंत ‘इतक्या’ अपघातांची नोंद
या पार्श्वभूमीवर रेल्वे पुणे विभागाकडून अपघात रोखण्यासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. एकूण 296 जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या असून, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडून प्रभावित ठिकाणी विशेष मोहीम राबविली जात आहे. ट्रेनपास करणाऱ्यांविरुद्ध १८८३ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. तसेच धोकादायक ठिकाणी बाउंड्री वॉल बांधकामासाठी अभियांत्रिकी विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची माहिती रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.