पुण्यात होणार अरिजित सिंहचा लाईव्ह शो (फोटो- सोशल मिडिया)
PCMC Police:अरिजित सिंह हा बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध गायक आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंह यांचा 16 तारखेला पुण्यात कार्यकम होणार आहे. मागील वर्षी देखील अरिजित सिंहचा कॉन्सर्ट पुण्यात पार पडला होता. 16 तारखेला त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. हा इव्हेंट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या ठिकाणी होणार आहे. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा इवेंट सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान या कॉन्सर्टनिमित पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहूतकीत काहीसे बदल जाहीर केले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.
मुंबईकडून येणारी वाहने
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या देहू रोड एक्झिटवरून डावीकडे घ्यावा. नंतर पुन्हा डावीकडे वळून मामुर्डीजवळील सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून येणाऱ्या वाहनांनी किवळे पुलावरून मुकाई चौकाकडे जाण्यासाठी यू-टर्न घ्यावा घेऊन सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
शितला देवी मंदिरावरून डावीकडे वळून लेखा फार्ममार्गे सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
जे कोणी अरिजित सिंहच्या कॉन्सर्टसाठी जाणार आहेत त्यांनी जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरून सेंट्रल चौकातून साई नगर फाट्याकडे पार्किंगसाठी यू-टर्न घ्यावा.
पुण्याकडून येताना
पुणे बंगळुरू एक्सप्रेस वे वरुन येणाऱ्या वाहनांनी किवळे पुलावरून डावीकडे वळून सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
निगडी, हँगिंग ब्रिजवरून येणारया गाड्या रावेत चौक, भोंडवे चौक, कृष्णा चौक येथून उजवीकडे जातील आणि तिथून आणि स्टेडियमकडे जातील.
कोणते रस्ते बंद?
मामुर्डी गावातील रुहिज बिर्याणी ते मासुलकर फार्मकडे जाणारी वाहने जाण्यास बंदी असेल.
कार्यक्रम संपल्यानंतर मुकाई चौक आणि किवळे अंडरपास मार्गे मुंबई आणि किवळेकडे जाण्यास वाहनांना बंदी असणार आहे.
जादुई’ आवाजाचा बादशाह पुन्हा पुण्यात
लोकप्रिय गायक ‘अरिजीत सिंग’च्या आवाजाने पुन्हा एकदा पुणेकरांचे (Arijit Singh Pune Show) काळीज धडधडणार आहे. देशासह जगभरात आपल्या आवाजाने तरुणाईची मने जिंकत, त्यांना वेड लावणारा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगचा (Arijit Singh Song) पुण्यातील कार्यक्रम जाहीर होताच काही दिवसातच ‘ओहर फ्लो’ झाला आहे. त्यामुळे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता कार्यक्रमाची तारीख व स्थळ ठरले असून, पुणेकरांचा उदंड प्रतिसाद अरिजीत सिंगच्या शो साठी मिळत आहे.
गायक प्रेमींनी पहिल्या काही दिवसांतच ‘तिकीट’ फुल केल्याने या कार्यक्रमाचे ठिकाण देखील बदलावे लागत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. पुढील महिन्यात (दि. 17 मार्च) हा कार्यक्रम पार पडणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध टू-बीएचकेकडून गेल्या वर्षी ‘राजा बहाद्दुर मिल्स’ येथे गायक अरिजित सिंहचा कार्यक्रम घेतला होता. त्याला रसिक पुणेकरांनी प्रचंड दाद दिली होती. त्यानंतर आता यावर्षीही आवाजाचा बादशहा मानल्या जाणाऱ्या अरिजितचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 3 मार्च रोजी हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी 17 हजार बैठक व्यवस्था केली होती. परंतु, तिकीट विक्री काही दिवसांत संपत ओहर फ्लो झाली. त्यासोबतच रसिकांकडून तिकीटाची मागणी होऊ लागली. त्यामुळे रसिकांच्या मागणीला मान देऊन आयोजकांनी हा कार्यक्रम पुढे ढकलत तो १७ मार्च रोजी ठेवला आहे.