पुण्यात मुसळधार पावसाळा सुरुवात (फोटो -तेजस भागवत)
पुणे: गेले काही दिवस पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र मध्यरात्रीपासून पुणे शहरात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने पुण्यात विश्रांती घेतली होती. क्वचितच पावसाची एखादी सर पाहायला मिळत होती. मात्र काल मध्यरात्रीपासून पुणे शहरात पावसाने प्रचंड जोर पकडला आहे. मुसळधार पाऊस शहरात सुरु आहे.
पहाटेपासून पुण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाने पुणे शहराला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर देखील झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
#पुणे जिल्ह्यासाठी आज दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी #रेडअलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन#Redalert #Pune pic.twitter.com/1tHmETongf
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 18, 2025
पावसामुळे पुणे शहरात वाहतूक थोडीशी संथ झाली आहे. पुणे शहराला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुणे शहरात सिंहगड रोड, पेठ भाग, शिवाजीनगर, धनकवडी परिसरात पावसाने जोर धरला आहे. तर भोर, मुळशी, आंबेगाव, जुन्नर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.
वीर धरणात विसर्ग सुरु
वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने रोजी आज सकाळी११ वा. नीरा नदीच्या पात्रात १ हजार८०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार. यामध्ये दुपारी १२ वाजता वाढ करून तो ६ हजार २३८ क्यूसेक करण्यात येणार. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
-कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा विभाग फलटण.
नीरा धरणातून विसर्ग सुरू
नीरा देवघर धरणातून नदीपात्रामध्ये ६ हजार ८८० क्युसेक विसर्ग सुरूआहे. नागरिकांनी उतरू नये. खबरदारी घ्यावी. -सहाय्यक अभियंता, श्रेणी १, निरा पाटबंधारे उपविभाग, निरा
#भाटघर धरण पूर्ण भरले असून ६ हजार ५१४ #क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी- जिल्हा प्रशासनाचे आवाहन
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 17, 2025
भाटघर धरणातून विसर्ग भाटघर धरण पूर्ण भरले असून ६ हजार ५१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी.
-जिल्हा प्रशासनाचे आवाहन
खडकवासला धरण
कालपासून खडकवासला धरणक्षेत्रात देखील पाऊस सुरू आहे. पानशेत, खडकवासला, वरसगाव, टेमघर घरं क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची धुमशान सुरू आहे. आजही (18 ऑगस्ट) राज्यातील तब्बल पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा कोल्हापूर , रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील खेडजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे.