पंकजा मुंडे यांचे वैष्णवी मृत्यू प्रकरणावर भाष्य (फोटो - सोशल मिडिया)
पुणे: राज्यभर सध्या वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोरयेत आहे. काल वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान आज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वैष्णवी हगवणेच्या कुटुंबाची भेत घेतली.
वैष्णवी हगवणेच्या कुटुंबाची भेतघेतल्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी आज वैष्णवीच्या आई-वडिलांची भेत घेतली. वैष्णवीवर जी वेळ आली ती वेळ कोणत्याच मुलीवर येऊ नये. आम्ही सर्वजण वैष्णवीसोबत आहोत. तिला न्याय मिळायलाच हवा. वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा तपास कोणाकडे द्यावा याचा निर्णय गृह मंत्रालय करेल. तिला न्याय मिळेल यात बद्दल कोणताही शंका माझ्या मनात नाही.”
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “एखाद्या महिलेने तक्रार केल्यावर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर दखल घेणे क्रमप्राप्त आहे. अनेक वेळ आलेल्या तक्रारी खोट्या असतात. मात्र दखल घेणे आवश्यक आहे. महिला आयोगाकडे ज्या सुनावण्या होतात. त्याच्याकडे प्राधान्याने वेळ देण्याची सूचना आम्ही करू.”
लाडकी बहीण योजनेसाठी अन्य विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप फडणवीस सरकारवर आरोप होत आहेत. दरम्यान यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील विरोधकांना उत्तर दिलेले आहे. आज यावर मुंडे यांना प्रश्न विचारला असता, पंकजा मुंडे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजनेचा निधी देण्यात कोणतीही काटकसर केली जात नाही. मोठमोठ्या योजनांना, फ्लायओव्हर्सना, रस्त्यांना योग्य निधी दिला जात आहे. लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तेव्हा सर्व आर्थिक गोष्टी विचारात घेऊनच घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवण्याची गरज नाही.”
आरोपी निलेश चव्हाणला अटक
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी फरार असणार्या निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर त्याच्या शोध पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणाऱ्या निलेश चव्हाण हा फरार होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत.
पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो परराज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवड मध्ये आणले जाणार आहे.