Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य; ‘सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’

गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावरून सध्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केले.

  • By विवेक
Updated On: Sep 04, 2026 | 05:57 PM
यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
  • पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांचे वक्तव्य
  • गणेशोत्सवाची पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश
 

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य करत राज्यात डीजेबंदीचे संकेत दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील डीजेमुळे होणारा त्रास लक्षात घेता त्यावर निर्बंध किंवा बंदी घालण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. पुणेकर आपली गणेशोत्सवाची परंपरा सांस्कृतिक पद्धतीने पुढे नेऊ शकतात, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता राज्यात डीजेबंदी होणार का? यावरून चर्चा रेणू लागल्या आहेत.

डीजेच्या वादाऐवजी सांस्कृतिक गणेशोत्सवावर भर

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. विशेषतः पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना परंपरा आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याचा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

डीजेच्या वापरावरून निर्माण होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी थेट डीजे बंदीबाबत निर्णय जाहीर न करता उत्सवाच्या स्वरूपावर भर दिला. ‘डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा,’ असे त्यांनी म्हटले.

पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा जपण्याचे आवाहन

पुणेकर गणेशोत्सव अधिक सांस्कृतिक पद्धतीने साजरा करू शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे पारंपरिक कला, संगीत, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्यावर भर देता येऊ शकतो.

दरम्यान, डीजेच्या आवाजावरून सध्या राज्यात विविध मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काहींकडून डीजेवर निर्बंधांची मागणी होत असताना उत्सव मंडळांकडूनही आपापली भूमिका मांडली जात आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनामुळे पुण्यातील गणेशोत्सवाच्या स्वरूपावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आता आगामी गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळे आणि नागरिक मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात, याकडे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

Web Title: Pune ganeshotsav devendra fadnavis appeal cultural celebration dj controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ
1

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई
2

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा
3

कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय
4

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.