पुणे मेट्रोला तीन वर्षे पूर्ण (फोटो- istockphoto)
पुणे: पुणे मेट्राेच्या सेेवेला तीन वर्ष पूर्ण हाेत आहेत. सुमारे एक लाख ६० हजार प्रवासी प्रति दिन मेट्राेने प्रवास करीत आहेत. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत पुणेकरांना चांगला पर्याय उपलब्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात ६ मार्च २०२२ रोजी पहिल्यांदा मेट्राे धावली हाेती. टप्प्या टप्प्याने सेवा वाढविली गेली, मेट्रो मार्गांच्या नेटवर्कचा विस्तार झाल्याने पुणेकरांसाठी एक वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे.
पुणे मेट्रोचे ६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले होते. यानंतर दोन प्रारंभिक मार्गांसह, पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वानझ ते गरवारे कॉलेज या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्या नंतर, मेट्रो नेटवर्कचा पुढे विस्तारित होत गेले. पुणे मेट्रोच्या सुरुवातीच्या काळात २१,४७,७५७ प्रवासी होते (मार्च २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत). १ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ते रूबी हॉल क्लिनिक आणि गरवारे कॉलेज ते जिल्हा न्यायालय या मार्गिकांच्या उद्घाटनानंतर प्रवसी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि १,२३,२०,०६७ झाली.
रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारामुळे प्रवासी संख्या १,६९,६९,५५४ पर्यंत पोहोचली. २९ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकांच्या उद्घाटनाने, ६ मार्च २०२२ ते ५ मार्च २०२५ या कालावधीत एकूण प्रवासी संख्या ५,९८,७६,७४३ झाली, त्याचबरोबर एकूण महसूल ९३,००,०४,२६८ रुपये झाला. पुणे मेट्रोची दररोजची सरासरी प्रवासी संख्या सुमारे १,६०,००० आहे.
पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग
स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्राे मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे. हा मार्ग आता शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार नाही असे महामेट्राेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील मेट्राे मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यामध्ये इतर मेट्राे मार्गाप्रमाणेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग भुयारी असुन, ताे सातारा रस्त्यावर धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जात आहे. अशी माहीती पुढे आली हाेती. सदर मार्ग हा समाधी मठाच्या खालून जात असल्याने मठाचे विश्वस्त, प्रशासन यांनी महामेट्राेला सदर मार्ग समाधी मठाच्या खालून नेण्यात येऊ नये अशी मागणी केली हाेती. या मागणीची महामेट्राेने दखल घेतली आहे.
Pune Metro News: पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?
महामेट्राेने श्री सदगुरु संतवर्य याेगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्टला पत्र पाठविले आहे. सदर मार्गचे आरेखन बदलण्यात आले आहे. समाधीच्या बाहेरून मार्गस्थ करण्यासाठी मार्गिकेचे आरेखन सुधारीत केले जात आहे. महामेट्राेने शहरातील मध्यभागातून भुयारी मार्ग आणि स्टेशन उभारले आहे. हे उभारताना परीसरातील काेणत्याही इमारतीला हानी पाेहचणार नाही याची काळजी घेतली आहे.