Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray: “मराठी बोलणार नाही, ही हिंमत येते कुठून?”; राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार

Raj Thackeray on Marathi Language: राज ठाकरे यांनी पुण्यात मराठी अस्मितेवरून सरकार आणि परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरचे कौतुक आणि हिंदीच्या सक्तीवर त्यांनी काय म्हटले? वाचा सविस्तर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 30, 2026 | 09:05 PM
राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार (Photo Credit- X)

राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार
  • पुण्यातील व्याख्यानमालेतून दिला कडक इशारा
  • आता थेट केली ही मोठी मागणी
पुणे: “आम्ही मराठी बोलणार नाही, असं म्हणण्याची टॅक्सी-रिक्षा चालकांची हिंमतच कशी होते? जर त्यांना मराठी येत नसेल, तर त्यांचे लायसन्स त्वरित रद्द करा,” अशी आक्रमक मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पुण्यातील ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेत ‘माझ्या मनातला महाराष्ट्र, मराठी अस्मिता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

हिंदी लादण्यावरून राज ठाकरेंचा प्रहार

मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, मराठी ही अत्यंत प्राचीन भाषा आहे, तर हिंदी अवघ्या १५०-२०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. हिंदीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अजून हजार वर्षे लागतील, अशा शब्दांत त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवर तोफ डागली. यावेळी त्यांनी बंगालमधील एक व्हिडिओ दाखवत, तिथले लोक स्वतःच्या भाषेसाठी किती कडवट आहेत याचे उदाहरण दिले. “तुम्ही जोपर्यंत आपल्या भाषेसाठी कडवट होत नाही, तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत,” असा सल्लाही त्यांनी मराठी भाषकांना दिला.

सचिन तेंडुलकरचे तोंडभरून कौतुक

राज ठाकरे यांनी क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे विशेष कौतुक केले. “सचिन भारतरत्न असूनही आपली भाषा आणि राज्य विसरलेला नाही. वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रम असो वा जागतिक व्यासपीठ, सचिन पहिले भाषण मराठीतच करतो, याचा मला अभिमान वाटतो,” असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी विनाकारण हिंदीत भांडणाऱ्या आणि चुकीची भाषा वापरणाऱ्या मराठी माणसांनाही खडेबोल सुनावले.

MNS राज ठाकरेंचा महिला आरक्षण अन् मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा की विरोध? स्पष्ट केली भूमिका

रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवर सरकारला फटकारले

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणे सक्तीचे आहे, मात्र काही संघटनांनी याला विरोध करत संपाचा इशारा दिला होता. यावर सरकारने माघार घेत १५ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आणि मराठी शिकवण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. “इतर राज्यांत, जसे की तामिळनाडू किंवा गुजरातमध्ये असे घडते का? आपले मंत्री परप्रांतीयांना मराठी शिकायला वेळ का देतात?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या चालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली.

जातीपातीच्या राजकारणावर चिंता

सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र सध्या जातीपातीच्या राजकारणात अडकला आहे. “आम्ही महापुरुषांना जातीत विभागले आहे. लेखक आणि कवींची जात पाहून पुस्तके विकत घेतली जातात, हे दुर्दैवी आहे. या वादातून आपण बाहेर पडले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

Parth Pawar Raj Thackeray Meet : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात

Web Title: Raj thackeray questions marathi language denial by rickshaw drivers pune speech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Maharashtra Govenment
  • Marathi Language
  • Pune
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray :  ‘आज प्रबोधनकार असते तर लेखणीचे आसूड ओढले असते’; राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला
1

Raj Thackeray : ‘आज प्रबोधनकार असते तर लेखणीचे आसूड ओढले असते’; राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
3

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
4

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.