पुण्याला पावसाने झोडपले (फोटो - istockphoto)
पुणे: गेले काही दिवस राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळत आहे. दरम्यान आज दुपारच्या वेळेस अवकाळी पावसाने पुणे शहराला देखील झोडपून काढले आहे. पुण्यातील पेठ भाग आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक पाऊस सुरू झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली.
शुक्रवारी पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील पाच दिवस शहरांत वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. गुरुवारपासून पुण्याच्या हवामानात बदल दिसुन येत आहे. तापमानात घट आणि वारे वाहु लागल्याने उन्हाळ्यात पुणेकरांना दिलासा मिळाला.
शुक्रवारी दुपारनंतर पुण्यात अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. शहराचे दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा ४ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या २ दिवसांपासून शहरात पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी शहराच्या दक्षिण भागात पाऊस सुरु झाला.
ग्रामीण भागात अधूनमधून पाऊस पडत होता. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान ३२.०८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच, किमान तापमान २१.०७ अंश सेल्सिअस होते. भारतीय हवामान खात्याच्या शिवाजी नगर कार्यालयाने ही माहिती दिली आहे. पुढील पाच दिवस पुणे शहराचे हवामान ढगाळ राहुन दुपारनंतर ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहुन मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला अाहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढील पाच दिवस छत्री, रेनकाेट घेऊनच बाहेर पडण्याची गरज आहे.
‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा
मुंबईमधील तापमानामध्ये वाढ होत आहे. तर तापमानात वाढ होत असतानाच मुंबईत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात तर तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Weather: ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपणार; कसे असणार राज्याचे वातावरण?
तर विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडार आणि गोंदिया जिल्ह्यांना २८ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ४४ अंशाच्या यावर पोहोचले आहे. कडक उन्हाळा जाणवत आहे. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर गरज असल्याच दुपारच्या वलेस घराबाहेर पाडण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात गारपीट होण्याचा इशारा
राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशीव, नांदेड, सोलापूर भागात पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत देखील पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.