मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी भारतीय नोटांवर गणपतीसह लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. याला काँग्रेसकडून विरोध होत असताना, आता भाजपा नेते व आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी देखील भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असावा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर माजी मंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी नोटांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याची मागणी केल्यानंतर आता नोटांवर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्याची मागणी भाजपा आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam_ यांनी केली आहे. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता राजकीय नेते वेगवेगळी भूमिका घेताना दिसताहेत.
[read_also content=”शिंदे गटातील एकाही आमदाराला भाजपमध्ये घेणार नाही, रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य https://www.navarashtra.com/maharashtra/will-not-accept-any-mla-from-shinde-group-in-bjp-said-raosaheb-danve-339467.html”]
दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून नोटांवर महाराजांचा फोटो लावाला अशी मागणी केली आहे, त्यानंतर आता भाजपा आमदार राम कदम यांनी आज ट्विट करत नोटांवर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे.
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..
जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl
— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022
याचबरोबर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुद्धा फोटो लावण्यात यावेत असं कदम यांनी म्हणत थेट त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय, या ट्विटमध्ये त्यांनी विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नोटावर फोटो लावले आहेत. तसेच “अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी!” असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.