Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!
Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब
खारघरच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मॅरेथॉनला एआयएमएस प्रमाणपत्र मिळाल्याने स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. महापौर नितीन पाटील आणि सभागृह नेते प्रकाश विनेदार यांच्या संकल्पनेतून १०० दिव्यांग धावपटूंनाही स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासोबतच समावेशकतेचा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार आहे. दरम्यान, मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते सकाळी ११ या वेळेत खारघर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या माहितीनुसार, ३, ५, १०, २१ आणि ४२ किलोमीटर अशा पाच गटांत स्पर्धा होणार आहे. सर्व गटांचा प्रारंभ व समाप्ती सेंट्रल पार्क येथे होईल. (फोटो सौजन्य – AI Created)
३ व ५ किलोमीटरची धाव गुरुद्वारा, जे. कुमार सर्कल, बी. डी. सोमाणी चौक आणि विनायक सेठ चौक मार्गे होईल.
तर १०, २१ आणि ४२ किलोमीटरचे मार्ग इस्कॉन मंदिर, ग्रामविकास भवन, उत्सव चौक, बेलपाडा, RBI मेट्रो स्टेशन, फणसवाडी टेकडी, टाटा हॉस्पिटल, तळोजा जेल आणि पापडीचा पाडा या भागांतून जाणार आहेत.
Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वाहतूक निबंधातून वगळण्यात आले आहे. मॅरेथॉनमुळे शहरात आरोग्य व क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.






