तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
कार्यक्रमप्रसंगी बोलताना एमएसीसीआयए चे अध्यक्ष रवींद्र माणगावे म्हणाले, “उद्योग आणि नवसंशोधन हाच भारताच्या आर्थिक विकासाचा खरा पाठीचा कणा आहे. आजच्या तरुण पिढीने केवळ नोकरी शोधणारे न राहता स्वतःचे उद्योग सुरू करून ‘नोकरी देणारे’ बनले पाहिजे. एमएसएमई आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून आपण ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. एमएसीसीआयए अशा सर्व नवउद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
दिपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. नवउद्योजकांना डिजिटल पाठबळ देण्यासाठी ‘एंटरप्रिन्योर्स क्लब ॲप’चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. त्यासोबतच उद्योजकांच्या यशोगाथा आणि मार्गदर्शक माहितीने समृद्ध असलेल्या ‘दीपस्तंभ’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
उपस्थितांना शासनाच्या एमएसएमई आणि स्टार्टअप योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी प्रदीप सावंत आणि प्रादेशिक अधिकारी डी. यु.थावरे यांनी एमसीईडीचे कार्यकारी संचालक किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यक्रमाला मुंबईतील शेकडो व्यावसायिक, नवउद्योजक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sugar Price Hike: इथेनॉलमुळे वाढतेय साखरेची किंमत? सरकारने अखेर सांगितलं कारण, सामन्यांना माहीत हवेच






