Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटकांनी माथेरानकडे धाव घेतली. मात्र, पर्यटकांच्या विक्रमी गर्दीमुळे घाटरस्त्यापासून दस्तुरी नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी, लांबच लांब रांगा आणि गैरसोयीचे चित्र पाहायला मिळाले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2026 | 01:17 PM
Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

Follow Us
Follow Us:
  • रविवारी माथेरानमध्ये हजारो पर्यटक दाखल झाल्याने घाटरस्ता आणि प्रवेशद्वारावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
  • दस्तुरी नाका येथे स्वच्छता कर भरण्यासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
  • ई-रिक्षा, वाहनतळ आणि मिनी ट्रेनवर वाढलेल्या ताणामुळे पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
Matheran: माथेरान शहरात आज रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक आले असून पर्यटकांच्या गर्दीने माथेरान नगरपरिषदेचे स्वच्छता कर संकलनाचे नियोजन बिघडले आहे. पावसाळ्यात शनिवार आणि रविवार मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात आणि त्यामुळे पर्यटन स्थळ पर्यटकांनी भरून गेले आहे. मात्र पर्यटकांचे मेगा हाल प्रवासी कर संकलन केंद्र आणि घाट रस्त्यातून प्रवास करताना होत असल्याने पर्यटकांची दमछाक होत आहे.

मुंबईतील वृक्षगणनेच्या ‘डेटा’ देखभालीत घोटाळा? ‘सार्क आयटी’ला दिले झुकते माप, प्रकरण न्यायालयात जाण्याची दाट शक्यता

माथेरानमध्ये पावसाळ्यात सर्वाधिक पर्यटक येत असतात. पर्यटकांनी पावसाळा सुरू झाल्यापासून गर्दी केली आहे, मात्र मागील चार दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तरी देखील पर्यटकांची गर्दी कमी झालेली नाही. शनिवार प्रमाणे आज रविवारी हजारोंच्या संख्येनं पर्यटक माथेरानमध्ये पोहचले आहेत. सकाळपासून नेरळ माथेरान घाटरस्ता वाहनाच्या गर्दीने भरला आहेत. वाहनांची संख्या प्रचंड असल्याने घाटरस्ता अत्यंत मंदगतीने पुढे सरसावत आहे. पण वाहनाची गर्दी एवढी
प्रचंड आहे की पर्यटकांची वाहने घाटरस्त्यातील वाहतूक कोंडीत फसत आहेत.

दुसरीकडे वाहतूक कोंडीतून पुढे आलेल्या पर्यटकांमुळे माथेरानमधील प्रवेशद्वार गर्दीने फुलून गेले आहे. दस्तुरी नाका येथे पर्यटकांची गर्दी झाल्याने स्वच्छत कर संकलन कार्यालयाच्या बाहेर पर्यटकांमध्ये हाणामारी होण्याचे प्रसंग सकाळपासून घडत आहेत. कर संकलन केल्याशिवाय कोणालाही शहरात प्रवेश दिला जात नसल्याने माथेरानचे प्रवेशद्रार गर्दीने फुलले आहे. त्याचा मोठा परिणाम तेथे वाहतूक कोंडीवर झाला आहे. प्रवासी कर घेण्यासाठी पर्यटकांच्या रांगा टॅक्सी स्टँड आणि दुसऱ्या बाजूला वाहनतळ या बाजूने देखील लावण्यात आली आहे. त्याचा थेट परिणाम वाहनतळाकडे जाणारी वाहने अडकून पडली आहेत.

ईश्वरपूरच्या राजकारणात भूकंप..! नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सत्ताधारी राष्ट्रवादीत खळबळ

वाहनतळ येथे एकावेळी किमान एक हजार गाड्या उभ्या राहण्याची व्यवस्था आहे, मात्र वाहनतळ येथे जाण्यासाठी असलेले मार्ग पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे माथेरानच्या प्रवेशद्वार येथे पर्यटकांच्या रांगा यामुळे गर्दी दिसून येत आहे. शहरात जाण्यासाठी असलेल्या इ रिक्षा स्टँड येथे देखील एकावेळी शेकडोच्या संख्येने पर्यटक उभे राहिलेले दिसून येत आहेत.

शहरात पर्यटकांचे सोयीसाठी केवळ २५ इ रिक्षा असल्याने त्या इ रिक्षा कमी पडत आहेत. त्यामुळे पर्यटकांची तेथे देखील गर्दी आहे. तर माथेरान ते अमन लॉज अशी मिनी ट्रेनची शटल सेवा चालवली जात असून स्थानकात देखील प्रचंड संख्येने पर्यटक उभे आहेत. तर तरुण पर्यटक रस्ते मार्गाने माथेरान शहरात प्रवेश करीत असल्याचे चित्र आहे. माथेरानमधील वाहतुकीचे नियोजन बिघडले असून पावसाचा एकही थेंब पडत नसताना देखील पर्यटकांची गर्दी झाल्याने पर्यटन बहरले असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Massive tourist rush hits matheran traffic jams and long queues leave visitors stranded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Karjat
  • Matheran
  • raigad

संबंधित बातम्या

Wildlife Warden: माणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती
1

Wildlife Warden: माणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
2

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
3

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई
4

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.