रायगड /संतोष पेरणे : दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे नेरळ स्थानक परिसरात वाहतूक कोडींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. नेरळचा विकास मुंबईचे उपनगर म्हणून झाला आहे. त्यामुळे रहिवाशी संख्या वाढली असून वाहनांची संख्या देखील वाढली आहे.त्याचा परिणाम नेरळ गावातील तीन ठिकाणी दररोज वाहतूक कोंडीची समस्या स्थानिक रहिवाशी यांच्यासाठी त्रासदायक ठरू लागली आहे.दरम्यान,वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी उड्डाण पुलाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
नेरळ हे गाव मध्य रेल्वेने जोडलेले असल्याने या ठिकाणी घर घेऊन राहायला येणारे यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यात नेरळ या ठिकाणी रात्री उशिरा पर्यंत उपनगरीय लोकल मुंबई येथून येत असतात.त्याचवेळी माथेरान सारख्या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या गावात मुबलक आणि शुद्ध पाणी उपलब्ध आहे.त्यामुळे मुंबई शहरातून या भागात राहायला येणारे यांची संख्या वाढली आहे.त्याचा त्यात नेरळ मध्ये राहायला येणारे लोक यांची संख्या वाढत आहे.त्यामुळे नेरळ गावात वाहनांची संख्या वाढली असून त्यामुळे नेरळ गावातील वाहतूक कोंडी दररोज नेरळ गावात दिसून येत आहे.त्यामुळे नेरळ गावातील रहिवाशी हे दररोज वाहतूक कोंडीला नेरळकर कंटाळले आहेत.त्यामुळे नेरळ गावातील जनता मध्य रेल्वेवर उड्डाण पुल कधी होणार अशी मागणी सातत्याने करीत आहे.
नेरळ गावात मध्य रेल्वेच्या फटकात दररोज वाहतूक कोंडी होत असून गेल्या काही वर्षात मालवाहू गाड्यांची संख्या वाढली असल्याने रेल्वे फाटक हे बहुतांश वेळ बंदच असते.त्याचा परिणाम नेरळ गावात हुतात्मा हिराजी पाटील चौकातील अंबिका नाका पर्यंत वाहने यांची रांग लागते.तर पलीकडे गंगानगर आणि मातोश्रीनगर खिंडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात.दुसरे वाहतूक कोंडीचे ठिकाण हे कल्याण कर्जत रस्त्यावर खांडा गावाच्या हद्दीत असून तेथे ममदापूर फाटा येथे रस्ता अरुंद असल्याने आणि त्यात रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत.त्याचवेळी माथेरान फाटा या ठिकाणी जकात नाका आणि हुतात्मा चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली असून नेरळ माथेरान कर्जत आणि कल्याण अशा चार ठिकाणी जाणारी वाहने मोठया प्रमाणावर एकत्र आल्यावर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.
उड्डाण पूल
नेरळ येथील मध्य रेल्वेच्या फाटक असलेल्या ठिकाणी रस्ता अरुंग असल्याने पंचवटी भागात उड्डाण पुल बनविण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.त्यासाठी मध्य रेल्वे कडून जागा देखील निश्चित करण्यात आली असून कल्याण कर्जत राज्यमार्ग वरून हा उड्डाण पूल नेरळ भीमाशंकर राज्यमार्ग असा जोडला जाणार असल्याची माहिती देण्यात येत असते.
भुयारी मार्ग …
सध्याच्या नेरळ फाटक येथे रस्ता अरुंद असल्याने आणि रस्त्याच्या कडेला रहिवासी घरे असल्याने तेथे उड्डाण पुल होणार नाही हे जवळपास नक्की झाले आहे.त्यामुळे नवीन ठिकाणी उड्डाण पुल बांधण्यात आल्यानंतर सध्याच्या फाटक असलेल्या ठिकाणी लहान वाहनांसाठी भुयारी मार्ग बनविण्यात यावा अशी मागणी स्थानिक करीत आहे.हा रस्ता बंद झाल्यास नेरळ पाडा भागातील रहिवाशी यांना पाडा भागाचा पुढचा भाग असलेल्या मातोश्री नगर मध्ये जाण्यासाठी अडचणीचे होणार आहे.त्यामुळे लहान वाहनांसाठी तेथे भुयारी मार्गाची मागणी स्थानिक करीत आहेत.