काळ आला पण वेळ नाही ; रखरखत्या उन्हात पेब किल्ल्यावर ट्रेकींग करणं बेतलं जीवावर
कर्जत/ संतोष पेरणे : उन्हाळी ट्रेकसाठी मुंबई येथून निघालेल्या सात तरुणांना नसतं धाडस करणं जीवावर बेतलं आहे . यातील सहा जणांना उष्माघात याचा त्रास झाला आणि मोठा कठीण प्रसंग निर्माण झाला होता.त्यात भरीला भर म्हणजे हे सात तरुण पेब किल्ल्यावर भटकले आणि त्यांनतर पोलिसांची मदत मागितली.शेवटी सह्याद्री पाच तरुणांसह दोन तरुणींना सुखरूप बाहेर काढण्यात करण्यात यश आले आहे.
मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानच्या शेजारील पेब किल्ला अर्थात विकट गड या ठिकाणी ट्रेकला जाण्यासाठी आले होते. नेरळ स्थानकापासून रिक्षाद्वारे आनंदवाडी येथे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर पेब किल्ल्याच्या दिशेने भर उन्हात डोंगर दर्यांची चढाई करत असताना येथील जंगलातील मार्ग चुकल्यामुळे आपल्या कडून किल्ल्याकडे जाणारा रस्ता भरकटला आहे असे या तरुणांच्या लक्षात आले. त्यात सोबत आणलेले खाण्या-पिण्याचे साहित्य संपले असताना दुपारी उन्हाचा ताप देखील वाढला त्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने व त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नव्हते.
यामुळे ट्रेकला आलेली तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर सोनू साहू तसेच अन्य सहकाऱ्यांना देखील उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने घाबरलेल्या अवस्थेत तरुणांनी झालेल्या प्रकाराबाबत आपल्या नातेवाईक तसेच मित्रमंडळींना दूरध्वनी वरून माहिती दिली. नातेवाईकांनी या किल्ल्यापासून जवळच असलेल्या माथेरान वनविभाग, पोलिसांसह नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याशी संपर्क साधला.मुंबईतील कॉलेज तरुण-तरुणी पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान डोंगराचे रांगेत असलेल्या पेब किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी आले होते. किल्ल्यावर जाण्याचा रस्तात भरकटल्याने भर उन्हामुळे उष्मघातासारखी परिस्थिती उद्भवल्याने यातील एक तरुणी बेशुद्ध पडली.त्यांनतर या तरुणांनी मदतीसाठी ११२ या क्रमांकावर संपर्क साधला.हा मेसेज जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष यांच्याकडून स्थानिक पोलिस असलेल्या नेरळ पोलीस ठाणे यांना प्राप्त झाला.त्यांनतर सदर तरुणांना रेस्क्यू करण्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेला पाचारण करण्यात आले होते. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे २१ ते २२ या वयाच्या आसपास असलेले कॉलेज तरुण-तरुणीपैकी सोनू साहू, निकिता जोबी, निखिल सिंग, साहिल लाले, चेतन पाटील, तेजस ठाकरे तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेली हिबा फातिमा हा तरुणांचा ग्रुप गेला होता.
नेरळ पोलीस ठाण्याचे शिवाजी ढवळे यांनी या तरुणांच्या बचाव कार्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेचे वैभव नाईक,चेतन कळंबे,संदीप कोळी,महेश काळे,सुनील कोळी,विकी फाळे,राहुल चव्हाण, सुनील ढोले दिनेश सुतार तसेच स्थानिक आदिवासी तरुण राम निरगुडा, काळूराम दरोडा यांना देखील पाचारण करण्यात आले होते. सोबत आपल्या नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप फड,पोलीस हवालदार निरंजन दवणे,निलेश कुमरे, दत्ता किसवे, सचिन वाघमारे, विनोद वागणेकर, सुनील गरजे अशी एक टीम तसेच वैद्यकीय पथक त्याचबरोबर माथेरान वनविभागाचे प्रथमेश पार्टे तनुज शिंदे,अंकित पार्टे यांना देखील घटनास्थळावर रवाना केले होते.यावेळी सह्याद्री रेस्क्यू टीमचे टीम लीडर चेतन कळंबे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी या सात ही तरुणांना अत्यावश्यक असलेले वैद्यकीय व खाण्याचे साहित्य, पाणी,तसेच मानसिक आधार देत गडावरून सुखरूप खाली आणले व नेरळ पोलीस तसेच आलेल्या नातेवाईकांकडे स्वाधीन केले.