File Photo : Rain
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता चांगलाच बरसताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यास पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने जोर धरल्याचे पाहिला मिळत आहे. काल रात्रीपासून पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. असे असताना आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई, ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह संपूर्ण कोकणाला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपले; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी
विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या भागांतील नद्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यासह संपूर्ण कोकणाला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचेही सांगण्यात आले.
विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा ‘अलर्ट’ देण्यात आला. नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain News: पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार; २६ ते ३० तारखेदरम्यान कसे असणार वातावरण?
मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.