Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या Ring ईव्हेंंटची एंट्री! स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार एक्झक्लूसिव रिवॉर्ड्स...
फ्री फायर मॅक्समध्ये अँजेलिक रिंग इव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा इव्हेंट पुढील 15 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या इव्हेंटमध्ये प्लेयर्स स्पिन करून रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना फ्लोरोसेंट अँजेलिक, ल्युमिसेंट अँजेलिक आणि अँजेलिकल जॉगर सारख्या पँट रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहे. तसेच या इव्हेंटमध्ये रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये रिंग टोकन एक्सचेंज करून देखील रिवॉर्ड्स मिळणार आहेत. यासाठी प्लेयर्सना एक्सचेंज सेंटरमध्ये जावे लागेल. 250 टोकन एक्सचेंज करून प्रिझम आणि क्रिस्टल विंग्स पेंट मिळणार आहे. 200 टोकन एक्सचेंज करून एंजेलिकल स्प्रिंटर, ल्युमिसेंट एंजेलिक पेंट आणि जॉगर मिळणार आहे. 4 टोकन एक्सचेंज करून क्राउंड काँगकरर पासून द एक्सक्यूशनर वेपन लूट क्रेटपर्यंत विविध रिवॉर्ड्स मिळणार आहेत. याशिवाय, 1 टोकन एक्सचेंज करून टीम बूस्टर आणि एन्हॅन्स हॅमर सारखे रिवॉर्ड्स मिळणार आहेत.






