मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना, शिंदे गट, राज ठाकरे व भाजपावर बोचरी टिका केली. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधत होते. तेव्हा आम्हाला हिणवलं गेलं. फक्त मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करतात, आणि टिव्हीवर दिसतात अशी आमच्यावर टिका करण्यात आली. मग आताचे मुख्यमंत्रीही तेच करतायत. जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर झाला पाहिजे, पण आम्ही त्याचा वापर केला की टिका आणि यांनी वापर केला की चांगले. म्हणजे नावडतीचं मीठ आळणी… हा प्रकार आहे. दरम्यान, सरडाही लाजेल एवढ्या भूमिका राज ठाकरेंनी बदलल्या अशी बोचरी टिका किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर केली.
[read_also content=”उरणमध्ये भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांचे सिडकोच्या विरोधात आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/farmers-protest-against-cidco-against-land-acquisition-in-uran-339483.html”]
दरम्यान, कोणाचं अस्तित्व कोणामुळं धोक्यात येत नसतं, तर, तुमचं अस्तित्व धोक्यात येत होतं, म्हणून तुम्हाला पक्ष वेगळा काढावा लागला, अशी टिका शिंदे गटावर किशोरी पेडणेकर यांनी केली. यावेळी त्यांनी भाजपा, शिंदे गटातील आमदार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.