Photo Credit : Social Media निवडणुकीत मतदारांची नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोपाला निवडणूक आयोगाचे उत्तर
मुंबई : हरियाणासह जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा आणि जम्मू-कश्मीरसह महाराष्ट्र आणि झारखंडच्याही निवडणुका जाहीर होणार होत्या.पण निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक घोषित न केल्यामुळे महाराष्ट्राची निवड़णूक कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर त्यांनी सणासुदीची संपूर्ण यादीच जाहीर केली.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राची निवडणूक कधी होणार असा सवाल विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आयुक्त राजीव कुमार म्हणाले, ” गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक सोबतच झाली होती. 3 नोव्हेंबर ला हरियाणाची मुदत संपत आहे तर 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राची आहे. त्यावेळी जम्मू-कश्मीरचा निवडणुकांचा कोणताही मु्द्दा नव्हता. पण यावेळी पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंडसह दिल्लीचीही निवडणूक होणार आहे.
हेदेखील वाचा: पुढील महिन्यामध्ये पंतप्रधान मोदींचा महत्त्वपूर्ण अमेरिका दौरा
या पाच राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी सुरक्षा बलांची पुरेशी व्यवस्थाही लागणार आहे. त्यातच महाराष्ट्रातील पावसामुळे बूथ लेव्हल ऑफिसर्सची कामेही झालेली नाही. त्यानंतर येत्या ऑगस्ट सप्टेंबरपासून महाराष्ट्रात गणेशोत्सव,पितृपक्ष, नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे सणही आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता हरियाणा आणि जम्मू कश्मीर या राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असलल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.
दरम्यान,केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणासह जम्मू-कश्मीर या राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होईल 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर य़ा तीन दिवशी जम्मू कश्मीरमध्ये मतदान होईल. तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबर रोजी मतदान होईल, या दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी होईल, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा: हरियाणात कशी असेल मतदान प्रक्रिया; कसे आहे मतांचे समीकरण?
राजीव कुमार म्हणाले, “जम्मू कश्मीरमध्ये एकूण 11,838 मतदान केंद्र असतील, तर 87.09लाख मतदार असतील. यात 20 लाखांहून अधिक नवमतदार आहेत. 20 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधील मतदार यादी जाहीर होईल. तर हरियांणामध्ये 90 विधानसभेच्या जागा आहेत. याठिकाणी 2.01 कोटी मतदार आहेत. याठिकाणी 20,629 हजार मतदान केंद्र असतील. 27 ऑगस्टला हरियाणातील मतदारांची यादी जाहीर होईल.