फोटो - सोशल मीडिया
वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वपूर्ण विदेश दौरा पुढील महिन्यामध्ये होणार आहे. सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा करणार आहे. ते संयुक्त राष्ट्र महासभेला उपस्थिती लावणार असल्यामुळे हा दौरा देशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महासभांच्या उच्चस्तरीय सत्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौरा करतील. सप्टेंबरमध्ये लॉन्गिंग आयलँडमध्ये नासाउ कोलियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी तिथे राहणाऱ्या भारतीयांसोबत देखील संवाद साधणार आहेत.
संयुक्त राष्ट्र सभांची अद्याप शेवटची यादी समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासंघाच्या उच्च स्तरीय बैठकीमध्ये सहभागी होतील. हा कार्यक्रम लॉन्ग आयलँडमध्ये होणार असून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. 16 हजार आसन क्षमता असलेले मैदान तयार केले जात आहे. 2014 मध्ये देखील न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध मॅडिसन स्क्वायर गार्डनमध्ये नरेंद्र मोदी यांनी भाषण केले होते. त्यानंतर आता थेट 10 वर्षांनंतर नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.
यावर्षी संयुक्त राष्ट्र महासभा 79 व्या सत्र 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण चर्चेसाठी तात्पुरत्या यादीनुसार, भारत सरकार प्रमुख (नरेंद्र मोदी) 26 सप्टेंबर रोजी उच्च स्तरीय बैठकीला संबोधित करतील. मात्र यादी अंतिम नाही. आता जाहीर करण्यात आलेली तात्पुरती यादी संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या सत्राच्या आठवड्यांमध्ये अपडेट केली जाते. यापूर्वी मोदींनी सप्टेंबर 2021 मध्ये वार्षिक उच्च-स्तरीय UNGA अधिवेशनाला संबोधित केले. गेल्या वर्षी 21 जून रोजी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये बिडेन यांनी आयोजित केलेल्या राज्य कार्यक्रमात भाग घेतला. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला उपस्थित राहणार आहेत.