राजकोट छत्रपती शिवाजी महाराज दुर्घटनेनंतर नवीन भव्य पुतळ्याचे सीएम देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण (फोटो सौजन्य - एक्स)
रायगड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथे भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मालवणमधील राजकोट येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये पुतळा पूर्णपणे कोसळला होता. यानंतर राज्य सरकारकडून पूर्ण काळजी घेऊन आणि अनुभवी शिल्पकारांच्या मदतीने नवीन पुतळा उभारण्यात आला. कोकणातील या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले आहे.
राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा उभारण्यात आलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नवीन उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी राजकोटमध्ये पुतळा पडण्याच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच ठिकाणी पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकोटमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शिल्पकार राम सुतार यांनी अतिशय सुंदर पुतळा बनवला आहे. कोकणाला वेगवेगळ्या प्रकारच्या चक्रीवादळांचा फटका बसतो. वादळे येतात. या सर्वांचा अभ्यास करून ते बनवण्यात आले आहे. जरी जोरदार वारा किंवा वादळ आले तरी पुतळा उभा राहील. हा पुतळा सुमारे ९१ फूट उंच आहे. त्याचा पाया १० फूट उंच आहे. तसेच हा महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जय शिवाजी जय भवानी🚩
LIVE | किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन
🕝 दु. २.४० वा. | ११-५-२०२५ 📍 सिंधुदुर्ग.#Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/BfZ7gTfRUl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 11, 2025
“या पुतळ्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती कोणत्याही वातावरणात किमान पुढील १०० वर्षे टिकेल. ज्यांनी हा पुतळा बनवला आहे ते पुढील १० वर्षे त्याच्या देखभालीची जबाबदारी घेतील. या संदर्भात त्यांनी हमी घेतली आहे. आजूबाजूच्या परिसराचे लवकरच नूतनीकरण केले जाईल. पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अनुभव घेता यावा यासाठी या ठिकाणी काम केले जाईल. लवकरच या भागाचा विकास केला जाईल,” असे आश्वासन राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
कोकणच्या विकासासाठी काम सुरू
पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “मंत्री नितेश राणे यांनी आजूबाजूच्या जमीन मालकांशी या विषयावर चर्चा केली आहे. यावेळी महायुतीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कोकणाला अधिक महत्त्व देण्यात आले. कोकणच्या विकासासाठी अजूनही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आठवण करून दिली की अलिकडेच मच्छिमारांना शेतकऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा देण्यात आला आहे,’ असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर फडणवीस म्हणाले की, “पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाच्या नियमांनुसार सर्व खबरदारी घेतली जात आहे”