मुंबई : मुंबईतील तरुणीची दिल्लीत झालेल्या निर्घुण हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मुंबईतील वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची (Shraddha walkar murder case) तिच्या प्रियकराने हत्या केली. या प्रकरणी विविध प्रतिक्रिया येत असून भाजपाचे नेते राम कदम यांनी एक ट्वीट केले आहे. जे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आरोपीने तिच्यावर धर्मांतराचा दबाव तर नव्हता केला ना? श्रद्धाचा खून म्हणजे लव्ह जिहादचे प्रकरण आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
[read_also content=”धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीवर घरात घुसून बलात्कार https://www.navarashtra.com/crime/shocking-a-girl-preparing-for-upsc-was-raped-inside-her-house-344871.html”]
दिल्ली येथे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. मे २०२२ मध्ये एका तरुणीची हत्या झाली होती. आता या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला असून यातून एक धकाकदायक प्रकार समोर आला आहे. या खून प्रकरणात प्रियकराने तरुणीच्या शरीराचे ३५ तुकडे करून त्यांना दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपील कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजपाचे नेते राम कदम यांनी प्रतिक्रीया दिली आहे. हा खून म्हणजे लव्ह जिहादचे प्रकरण आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
क्या यें #lovejihad का मामला है ? हम देल्ही पुलिस से निवेदन करते है की वे वसई निवासी #श्रधा के मर्डर के बारे में तफ़तिश करे और खंगाले की आरोपी धर्म परिवर्तन करना चाहता था ? और श्रद्धा ने मना किया ? क्या यही वजह थी ? क्या यह लवजिहाद का मामला है
— Ram Kadam (@ramkadam) November 14, 2022
“हे प्रकरण लव्ह जिहादचे आहे का? वसईमधील तरुणी श्रद्धाच्या खुनाचा दिल्ली पोलिसांनी तपास करावा. तसेच आरोपी मृत तरुणीचे धर्म परिवर्तन करू इच्छित होता का, हेही तपासावे. श्रद्धाने धर्मांतरास नकार दिल्यामुळेच आरोपीने तिचा खून केला का? या सर्व बाबींची दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी,” अशी मागणी राम कदम यांनी ट्वीटद्वारे केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आफताब अमीन पूनावाला नावाच्या व्यक्तीनं कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या श्रद्धा वॉकर या महिला सहकाऱ्याला लग्नाच्या बहाण्यानं मुंबईहून दिल्लीला आणलं. काही दिवसांनी श्रद्धानं त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. तेव्हा आफताबनं तिची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्यानंतर दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली.”हत्या झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली.