मांजराच्या वादातून २ गटांत हाणामारी (फोटो- ai gemini)
पहिली घटना ५ सप्टेंबर रोजी आरे पाखाडी, कालभैरव मंदिरासमोर घडली. फिर्यादी प्रसाद प्रकाश कदम (वय ३७, रा. कदमवाडी) हे आपल्या पत्नीसोबत हरवलेल्या मांजराबद्दल चर्चा करत असताना, संशयितांनी गैरसमजातून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्या, ब्लेड, बुक्क्यांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला चढवला.
गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद
पहिल्या तक्रारीनुसार, प्रसाद कदम, त्यांची पत्नी पूर्वी कदम, भाऊ पंकज कदम व प्रतीक्षा कदम हे ४ जण या घटनेत गंभीर जखमी झाले. संशयित आरोपीनी पाखाडी साफसफाईच्या कामावरून वाद घालत प्रसाद यांच्या अंगावर धावून जाऊन ब्लेडने ओरखडे मारले. तसेच लाकडी काठी, मुक्क्या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला, कपाळाला, नाकाला गंभीर दुखापत झाली
आहे.
या प्रकरणी दिपाली कदम, विदेश कदम, मयुरेश आरेकर, संदेश कदम, आदेश कदम, साक्षी कदम, पल्लवी कदम, अस्मिता पेडणेकर, अपेक्षा कदम, साहिल शिवलकर, सागर शिवलकर, आनंद पेडणेकर, रत्नाकांत मयेकर अशा १४ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गु.र.नं. २०३/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिलेवरही उगारला हात; पोलिसांकडून पुढील तपास सुरू
दुसऱ्या बाजूने अस्मिता आनंद पेडणेकर (वय ५०, रा. मयेकर वाडी, आरे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या दुकानात जात असताना आरडाओरडा ऐकून भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी प्रसाद कदम हा हातात लादी घेऊन उभा होता. ‘तुझा काय संबंध’ असे म्हणत प्रसाद कदम, पंकज कदम या दोघांनी अस्मिता यांच्या छातीवर हाताने व फायटरने मारहाण केली. तसेच संशयित दुर्वांक कदम याने त्यांच्या डोक्यावर कसल्यातरी वस्तूने मारले, रशंदा कदम हिने काठीने मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी प्रसाद कदम, पंकज कदम, दुर्वांक कदम व रक्षेदा कदम या चौघांविरोधात गु.र.नं. २०४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.






