मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बीआयटी चाळीच्या पुनर्विकासाचा देखील तातडीने सोडवावा. यासाठी शिवसेनेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
मुंबई शहरात ज्या प्रमाणे बीडीडी चाळी आहेत त्याच प्रमाणे १०० हुन अधिक बीआयटी चाळी आहेत. तसेच या चाळी १०० हुन अधिक वर्ष जुन्या झाल्याने यापैकी काही चाळी धोकादायक म्हणून देखील घोषित करण्यात आल्या. त्यामुळे अशा चाळीतील रहिवाशांना माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. आग्रीपाडा, नागपाडा आदी भागातील काही चाळींचा पुनर्विकास झाला आहे. मात्र बहुतांश चाळी या आजही धोकादायक अवस्थेत असून त्यात सुमारे साडेपाच ते सहा हजार कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहेत. बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा ठोस निर्णय होत नसल्यामुळे रहिवासी माहुल येथे जाण्यास तयार नाहीत. ताडवाडी माझगाव येथील तीन इमारती अति धोकादायक झाल्यामुळे तेथील 220 कुटुंबीयांना सहा वर्षांपूर्वी माहुल येथील इमारतींमध्ये स्थलांतर करण्यात आले. पण माहुल मधील प्रदूषणामुळे रहिवासी त्रस्त आहेत.
बीआयटी चाळीच्या दुरावस्थेकडे शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा जसा निर्णय घेतला तसा बीआयटी चाळीबाबतही निर्णय घ्यावा. जर बीडीडी चाळीतील रहिवाशांना मालकी हक्काची घरे मिळणार असतील तर बीआयटी चाळीतील रहिवाशांना का नाही, असा सवाल जामसुतकर यांनी केला आहे. दरम्यान २०१६ साली बीआयटी चाळीमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटाचे घर देण्यासह माहुल येथे पाठवण्यात आलेल्या २२० कुटुंबियांचे लवकरात लवकर माझगाव ताडवाडीमध्ये पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबईतील काही मुख्य बीआयटी चाळी