मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी (Repair And Maintainance Work) मेगाब्लॉक (MegaBlock) घेण्यात येणार नसून आज फक्त ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गावर असणार आहे. यामुळे मुख्य मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांची मध्य रेल्वेने कोंडी केली आहे.
ठाणे – वाशी / नेरुळ (Thane Vashi Nerul) अप आणि डाऊन (Up And Down) ट्रान्स हार्बर लाइन्स (सकाळी 11.10 ते संध्याकाळी 16.10)
मध्य रेल्वे ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक 5 तास चालवणार आहे. ठाणे-वाशी (नेरुळ) अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेलहून सुटणाऱ्या ठाण्याकडे सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंतच्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.