मुंबई : मध्य रेल्वेतर्फे (Central Railway), मुंबई विभागात (Mumbai Division) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Maintainance and Repair Work) आज आपल्या उपनगरीय विभागांवर (Suburban Devision) मेगा ब्लॉक (MegaBlock) तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक (No MegaBlock On Western Railway) घेण्यात येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
[read_also content=”सिट्रोनची नवीन सी ५ एअरक्रॅास एसयुव्ही भारतात लाँच : अधिक आरामदायी, मजबूत आणि अनोख्या डिझाईनने युक्त एसयुव्ही https://www.navarashtra.com/automobile/citroen-launches-new-c5-aircross-suv-in-india-more-comfortable-stronger-and-unique-design-nrvb-324443.html”]
ठाणे (Thane) येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल (Panvel) येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष उपनगरीय (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/ नेरुळ – खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.