(फोटो- istockphoto )
मुंबई: शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिल्या. मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांच्या आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीला सह सचिव कैलास गायकवाड, अवर सचिव सुनील सामंत उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागीय आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री जाधव-पाटील यांनी या बैठकीत सन २०२३ व २०२४ मधील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांचा आढावा घेऊन ही प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तालुकास्तरीय समितीने संबंधित यंत्रणांकडून आवश्यक असणारा अहवाल प्राप्त करून घ्यावा. जिल्हास्तरावरही प्रलंबित प्रकरणाचा नियमित आढावा घेऊन प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावावीत. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणांचा आढावा घ्यावा. शेतकरी आत्महत्या मदतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री जाधव -पाटील यांनी सांगितले.
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारी योजना
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून पारंपारिक कृषी विकास योजना (PKVY) चालवली जात आहे. ही योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान (NMSA) अंतर्गत मृदा आरोग्य व्यवस्थापन (SHM) चा भाग आहे. पीकेव्हीवाय योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी सरकार मदत करेल.
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारी योजना, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३१,५०० रुपयांची मदत!
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारकडून पारंपारिक कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते. जेणेकरून शेतकरी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करतील.
संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, “ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे सरकार बोलत आहे घोषणा करत आहे. पण प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती काय आहे? कैलासचे तुम्ही जे नाव घेतलं त्याच्याविषयी मला माहिती आणि मला वाटल या राज्याची परिस्थिती आणि हे राज्य प्रगतीपथावर आहे असं तुम्ही म्हणत आहात हे राज्य प्रगतीपथावर नसून हे राजी अधोगतीला लागलं आहे. महाराष्ट्रात रोज आणि देशात रोज 22 शेतकरी आत्महत्या करतात या देशाची राज्याचे परिस्थिती आहे. नरेंद्र मोदी गंगाजल कुंभ घेऊन जगभरात फिरत आहेत आज मॉरिशस , नेपाळ परवा म्यानमार फिरत आहेत आणि किसान मरत आहेत,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.