शिक्रापूर : नागरगाव (ता.शिरुर) येथील नंडगेवस्ती चोरट्यांनी भर दिवसा दुपारच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप (Robbery in Nagargaon) तोडले. त्यात तब्बल तीन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा (Crime in Shikrapur) दाखल करण्यात आला आहे.
नागरगाव येथील नंडगेवस्ती येथे राहणारे एकनाथ नलगे हे 4 जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेलेले होते. दुपारी दीडच्या सुमारास नलगे हे पुन्हा घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचे तसेच आदी साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यानंतर एकनाथ नलगे यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक लाख 56 हजार रुपये असा सुमारे तीन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
याबाबत एकनाथ विष्णू नलगे (वय 32 वर्षे रा. नंडगेवस्ती नागरगाव ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.